लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ७ डिसेंबरला ९ ते १२ च्या शाळा सुरू करण्याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे . पाटील यांनी चाचपणी सुरू केली असून शाळा समितींना देण्यासाठी त्यांनी पाच मुद्यांचे पत्र तयार केले आहेत. शाळा समितींना हे पत्र देऊन त्यानुसार नियोजन करून घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी पाटील यांनी दिली दरम्यान, २४ शिक्षक बाधित आढळून आल्याने शाळा सुरू हाेतील का याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.
२३ नोव्हेंबरला शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्या शासनाकडून घेण्यात आला होता. स्थानिक परिस्थिती बघता स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घ्यावा, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार ७ डिसेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिाकरी अभिजित राऊत यांनी काढले होते. दरम्यान, शाळा सुरू होणार म्हणून साधारण १४ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यात काहींच्या चाचण्या झाल्या तर काहींच्या बाकी आहेत. त्यातही २४ शिक्षक आणि १४ शिक्षकेतर कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत.
या पाच मुद्दयांचे स्पष्टीकर मागणविणा
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या झालेल्या आहेत का, शाळा निर्जंतुकीकरण झाले आहे का, विद्यार्थ्यांची सुरक्षित अंतर ठेवून बसण्याची व्यवस्था, पालकांची जागृती आणि पालकांचे समंतीपत्र अशा पाच मुद्दयांबाबत शाळा समितीकडून माहिती मागणविण्यात येणार आहे.