शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथे ग्रामस्थांचे सिंचन प्रकल्पासाठी साखळी उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 16:25 IST

भडगाव तालुक्यात कमी पाऊसमान म्हणून आधीच अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या जुवार्डी भागातील पाझरतलाव क्रमांक तीन व नदीजोडतंर्गत आडळसे-जुवार्डी-पथराड पोहोच कालव्याचे काम वर्षानुुवर्षे अर्धवटच असून, यासाठी मंगळवारी शिवजयंतीपासून जुवार्डी येथील ग्रामस्थांनी गावातील शहीद स्मारकाजवळ साखळी उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देनिधीचा अभाव व दुर्लक्षपाझर तलाव ३० वर्षांपासून रखडला‘नदीजोड’चा ‘जोड’ही जुळेनावनविभागाने हरकत घेतल्याने काम पडले बंद

खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : तालुक्यात कमी पाऊसमान म्हणून आधीच अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या जुवार्डी भागातील पाझरतलाव क्रमांक तीन व नदीजोडतंर्गत आडळसे-जुवार्डी-पथराड पोहोच कालव्याचे काम वर्षानुुवर्षे अर्धवटच असून, यासाठी मंगळवारी शिवजयंतीपासून जुवार्डी येथील ग्रामस्थांनी गावातील शहीद स्मारकाजवळ साखळी उपोषण सुरू केले आहे.सकाळी हनुमान मंदिरापासून फेरी काढत शहीद स्मारकास अभिवादन व शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन करून गावातील संपूर्ण ग्रामस्थ उपोषणास बसले. यासंदर्भात ग्रामस्थांनी याआधीच आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांकडे दिले आहे.दरम्यान, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी यांनी जि.प. मृद व जलसंधारण विभागाला दि.१५ रोजी एक पत्र देवून जुवार्डी पाझर तलावाच्या पोटी वनविभागाला द्यावयास लागणाºया ८१ लाख ३८ हजार एन.पी.व्ही. निधीचा प्रस्ताव आवश्यक त्या त्रुटीची पूर्तता करुन सादर करावयास सांगितले आहे. या आशयाचे पत्र ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांना उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ग्रामपंचायतीला प्राप्त झाले असले तरी ठोस आश्वासनाशिवाय उपोषण सुरुच ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे.काय आहे जुवार्डीकरांची मागणी?जुवार्डी गावाच्या वरच्या भागात वनविभागाच्या हद्दीत १९८०मध्ये पाझर तलावाचे काम रोहयोंतर्गत सुरू झाले. माती भरावाचे नव्वद टक्के काम दोन-चार वर्षात पूर्ण झाले. फक्त नाल्याची धार बंद करण्याचे १० टक्के इतके काम बाकी असताना वनविभागाने हरकत घेतल्याने ३० वर्षांपासून काम बंद पडले. त्यानंतर पाठपुरावा झाला. वनविभागाने हिरवा कंदील दाखविला. पण वनविभागाला लागणाºया एन.पी.व्ही. रकमेअभावी आता मागील काही वर्षांपासून काम रखडले आहे. याचबरोबर गिरणा धरणातून निघालेल्या वसंतदादा कालव्यापासून आडळसे-जुवार्डी ते पथराड धरण असा पोहोच कालव्याचे काम नदीजोड योजनेतून सुरू झाले, मात्र निधीअभावी तेदेखील काम बंद पडले. तिसरी मागणी बहाळ येथील जामदा कालव्यापासून ते जुवार्डी असा झालेला जुना सर्व्हे पूर्ण करून त्याचा लाभ मिळावा ही आहे. ही तीनही कामे पूर्ण झाल्यास तालुक्यात सर्वाधिक मोठे शिवार असलेले (जवळजवळ १००० हेक्टर) जुवार्डी सुजलाम-सुफलाम होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव