शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या मावळत्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यकाळाची सुरुवात व शेवट मारहाणीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:09 IST

योगायोग : डॉ. संजीव पाटील यांच्या कार्यकाळात विधानसभा निवडणुकीसह जि.प. अध्यक्ष निवड

जळगाव : भाजपचे मावळते जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांच्या कार्यकाळाची सुरुवात व शेवट पक्षांतर्गत मारहाणीच्या घटनेने झाल्याचा योगायोग पक्षाने अनुभवला. अमळनेर येथील हाणामारीच्या घटनेनंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी राजीनामा दिला व ही सूत्रे डॉ. पाटील यांच्याकडे आली. त्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीप्रसंगीही जळगावात पुन्हा मारहाण झाली.जळगाव जिल्हा हा सुरुवातीपासूनच भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे सुरुवातीपासून येथील भाजप जिल्हाध्यक्षांच्या कामाची सर्वत्र चुणूक असल्याचे बोलले जाते. यात विद्यार्थी परिषदेच्या कार्यपद्धतीतून पुढे आलेले उदय वाघ यांनी अनेक वर्षे हे पद संभाळले व जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभेत जिल्ह्याचे वर्चस्व टिकवून ठेवण्यास हातभार लावला. मात्र २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी बदलण्यावरून उफाळून आलेल्या वादातून अमळनेर येथे माजी आमदार बी.एस. पाटील यांना पक्षाच्या व्यासपीठावरच वाघ व त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या घटनेनंतर या पदाची सूत्रे डॉ. संजीव पाटील यांच्याकडे आली. या दरम्यान संघटनात्मक निवडणुकांसाठी सक्रीय कार्यकर्ते नोंद, बुथ प्रमुख, मंडळ अध्यक्ष निवड या प्रक्रिया त्यांनी पूर्ण केल्या. मात्र शेवटी जिल्हाध्यक्ष निवडीप्रसंगीच पुन्हा मारहाणीचा प्रकार घडला.भुसावळ शहर तालुकाध्यक्ष निवडीवरून व्यासपीठावरच पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे यांना भुसावळ येथीलच कार्यकर्त्यांनी मारहाण करीत शाई फेक केली. मिळालेल्या कार्यकाळात डॉ. पाटील यांनी वेगवेगळ््या जबाबदाऱ्या पार पाडल्या. मात्र या मारहाणीच्या घटनेने त्यांचा कार्यकाळ संपला.भावूक होऊन सोपविली वाहनाची चावीजिल्हाध्यक्ष निवडी प्रसंगी अगोदर डॉ. पाटील यांनीही या पदासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले. मात्र नंतर त्यांनी माघार घेतली. शेवटी हरिभाऊ जावळे यांची निवड जाहीर होताच डॉ. पाटील यांनी भावूक होत जिल्हाध्यक्षांच्या वाहनाची चावी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली.नेवे मारहाण प्रकरणी शिस्तभंगाचा अहवाल सादररावेर/ भुसावळ : जळगाव येथील भाजप जिल्हाध्यक्ष निवडीच्या विशेष सभेत जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे यांच्या अंगावर शाई टाकून लाथाबुक्क्यांनी मारहाण करतांना फुटेजमध्ये आढळून येणाºया दोषी कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई करण्यासंबधी प्रदेश कार्यालयाकडे शिस्तभंगाचा अहवाल सादर झाला आहे. येत्या आठवडाभरात संबंधित दोषींविरुद्ध थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव