शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, पगार बंद; उदरनिर्वाहासाठी वाहकानं सुरू केली रसवंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 15:07 IST

ऐन थंडीच्या दिवसांत रस्त्याच्या कडेला असलेली ही रसवंती पाहून तुम्हाला वाटेल की उन्हाळा सुरू झालाय. पण नाही, ही रसवंती उन्हाळ्यासाठी नाही तर गरजेपोटी सुरू झाली आहे.

प्रशांत भदाणे -​​​​​​​जळगाव- एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं, या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या 3 महिन्यांपासून संपावर आहेत. संप मिटावा म्हणून राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्यानं संप चिघळला आहे. यामुळे पगाराअभावी एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितीत राज्यातील काही एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली, तर काही कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी पर्यायी मार्ग निवडला आहे. पाहुयात अशाच एका एसटी कर्मचाऱ्याची व्यथा, उदरनिर्वाहासाठी हा कर्मचारी करत असलेली धडपड पाहून तुमचेही डोळे पाणावतील...

ऐन थंडीच्या दिवसांत रस्त्याच्या कडेला असलेली ही रसवंती पाहून तुम्हाला वाटेल की उन्हाळा सुरू झालाय. पण नाही, ही रसवंती उन्हाळ्यासाठी नाही तर गरजेपोटी सुरू झाली आहे. ही रसवंती चालवणारी व्यक्ती एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहे. प्रवीण चौधरी असं या वाहकाचं नाव. एसटीच्या संपामुळं उपासमारीची वेळ आल्यानं प्रवीण यांनी मित्रांकडून उसने पैसे घेऊन रसवंती सुरू केली आहे. हाताला ऊस काढण्याची सवय नाही, पण परिस्थितीनं त्यांच्यावर ही वेळ आणली आहे. आधीच कोरोनामुळं वेळेवर पगार होत नसल्यानं एसटी कर्मचारी अडचणीत होते. त्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्यानं संप चिघळला. अशा परिस्थितीत घर चालवणं कर्मचाऱ्यांना कठीण झालंय. प्रवीण यांच्यावर म्हातारे आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुलांची जबाबदारी आहे. तीन महिन्यांपासून पगार नसल्यानं त्यांनी अखेर व्याजाने पैसे घेऊन रसवंती सुरू केली.

प्रवीण चौधरी मूळचे जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावचे रहिवासी आहेत. ते 2009 मध्ये एसटी महामंडळाच्या पालघर विभागात वाहक म्हणून नोकरीला आहेत. यानंतर त्यांनी भिवंडी येथे सेवा बजावली. सध्या ते धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा आगारात सेवेत आहेत. 12 ते 13 वर्षे सेवा झाली असली तरी त्यांच्या हातात अवघा 8 ते 9 हजार रुपये पगार येतो. एवढ्या कमी पगारदार घर चालवताना खूप कसरत होते. आता परिवहन मंत्री म्हणतात की एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ दिली. पण प्रत्यक्षात ही पगारवाढ 21 ते 22 टक्केच असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे. ही पगारवाढ घेऊनही फायदा नाही, असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

 

बिकट परिस्थितीमुळं आजपर्यंत 85 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलीये. सरकारने मागण्या अशाच दुर्लक्षित केल्या तर विपरीत घडू शकतं. असं होऊ नये म्हणून सरकारनं एसटीचं विलिनीकरण करावं, अशी आग्रही मागणी प्रवीण चौधरींनी यावेळी केली.

अशा बिकट परिस्थितीला सामोरे जाणारे प्रवीण हे राज्यात एकटे नाहीत, असे हजारो प्रवीण आज उदरनिर्वाहासाठी डोक्याला हात लावून बसलेत. त्यांच्या मागण्यांकडे मायबाप सरकार आतातरी लक्ष देईल का? हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपJalgaonजळगाव