शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे पंढरपूर येथून सोमवारी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 3:14 PM

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व श्री संत मुक्ताबाई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे सोमवार, दि.२७ मे रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान होत आहे. २९ रोजी श्रीक्षेत्र कोथळी येथे संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्यास श्री पांडुरंग पालखी सोहळ्याची हजेरी राहणार आहे.

ठळक मुद्देश्री पांडुरंग पादुकांची विधीवत पूजा झाल्यानंतर मंदिरे समितीच्या वतीने मानकऱ्यांचा सन्मान २९ रोजी श्रीक्षेत्र कोथळी येथे संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्यास श्री पांडुरंग पालखी सोहळ्याची हजेरी राहणार२७ रोजी सकाळी ९ वाजता करमाळा, दुपारी १२ अहमदनगर, सायंकाळी ४ वाजता नेवासा फाटा मार्गे सायकाळी ७ वाजता औरंगाबाद येथील श्री गजानन महाराज मंदिरात मुक्कामीसंत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळ्याच्यानिमित्ताने कीर्तनाची सेवा३० रोजी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र कोथळी ते श्री क्षेत्र मुक्ताईनगर दिंडी मिरवणूक३१ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ द्वादश पारणे सोहळा १ जून रोजी देऊळगावराजा, जालना, अंबड, गेवराई मार्गे बीड मुक्कामी२ जून रोजी कुंतलगीरी फाटा, बार्शी येथील श्री भगवंत मंदिर, कुडुर्वाडी मार्गे सायंकाळी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल

मुक्ताईनगर, जि.जळगाव : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व श्री संत मुक्ताबाई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे सोमवार, दि.२७ मे रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान होत आहे. २९ रोजी श्रीक्षेत्र कोथळी येथे संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्यास श्री पांडुरंग पालखी सोहळ्याची हजेरी राहणार आहे.या बाबत श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी महिती देताना सांगितले की, श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र मुक्ताईनगर हा परंपरेने सुरू असलेला पालखी सोहळा श्री संत मुक्ताबाई यांच्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी सोमवार, २७ मे रोजी सकाळी ६ वाजता श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान करणार आहे. श्री पांडुरंग पादुकांची सकाळी ६ वाजता विधीवत पूजा झाल्यानंतर मंदिरे समितीच्या वतीने मानकऱ्यांचा सन्मान होईल व हा सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान करेल.२७ रोजी सकाळी ९ वाजता करमाळा, दुपारी १२ अहमदनगर, सायंकाळी ४ वाजता नेवासा फाटा मार्गे सायकाळी ७ वाजता औरंगाबाद येथील श्री गजानन महाराज मंदिरात मुक्कामी पोहोचेल.मंगळवार, २८ रोजी सकाळी सिल्लोड, दुपारी जामनेर, सायंकाळी कुºहा पानाचे मार्गे सायंकाळी ५ वाजता श्री विठ्ठल मंदिर, भुसावळ येथे पोहोचेल. येथे संत निवृत्तीनाथ व श्री पांडुरंग पादुका भेटीचा सोहळा होईल, तर पंढरपूरहून निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या पादुका मुक्ताईनगर मुक्कामी पोहोचतील.बुधवार, २९ रोजी श्री क्षेत्र कोथळी येथे श्री संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा असून, या सोहळ्यासाठी श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळा पोहोचेल. संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळ्याच्यानिमित्ताने कीर्तनाची सेवा संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. केशवदास नामदास करतील, तर रात्री संत निवृत्तीनाथ संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. जयंत महाराज गोसावी कीर्तन सेवा करतील.गुरुवार, ३० रोजी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र कोथळी ते श्री क्षेत्र मुक्ताईनगर दिंडी मिरवणूक होईल. त्यानंतर हा सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे मुक्कामी विसावेल.शुक्रवार, ३१ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ द्वादश पारणे सोहळा होईल आणि त्यानंतर श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु होईल. मलकापूर, मोताळा , बुलढाणा मार्गे हा सोहळा श्री क्षेत्र चिखली येथील श्री रेणुका माता मंदिरात मुक्कामी पोहोचेल. शनिवार, १ जून रोजी देऊळगावराजा, जालना, अंबड, गेवराई मार्गे बीड मुक्कामी पोहोचेल. बीड येथील श्री हनुमान मंदिरात पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे.रविवार, २ जून रोजी कुंतलगीरी फाटा, बार्शी येथील श्री भगवंत मंदिर, कुडुर्वाडी मार्गे सायंकाळी ६ वाजता हा सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल.यावेळी पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, सूर्यकांत भिसे आदी उपस्थित राहणार आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर