शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

जिल्हाधिका-यांच्या विशेष परवानगीने मोकळा झाला उपचाराचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 20:40 IST

मातोश्री वृध्दाश्रमातील कोरोनाबाधितांना दिलासा : एकाच दिवसात आढळले १८ पॉझिटिव्ह

जळगाव : सावखेडा शिवारातील मातोश्री वृध्दाश्रमात कोरोनाने शिरकाव केला असून बुधवारी एकाच दिवसात वृध्दाश्रमात १८ जणांना कोरोनाची बाधा झाली. या वृध्दांकडे आधारकार्ड अथवा इतर कागदपत्रे नसल्याने उपचारासाठी अडचणी येत असताना सेवारथ परिवाराने पुढाकार घेत उपचारासाठी हालचाली केल्या. याविषयी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ यंत्रणेला आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या व या निराधारांना उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.अनाथ, निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिकांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे यासाठी सावखेडा शिवारातील मातोश्री वृध्दाश्रमात अशा ज्येष्ठ नागरिकांना आधार दिला जातो़ वृध्दाश्रमात ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे वृध्द आहेत. सध्या कोरोना विषाणूने पुन्हा हातपाय पसरल्यानंतर जिल्ह्यासह जळगाव शहरात आता पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. वृध्दाश्रमातील वृध्दांनाही काहीसे लक्षणे जाणवू लागली. बुधवारी त्यांची खाजगी रूग्णालयात अ‍ॅन्टीजेन तपासणी केली गेली. आणि काही वेळातचं तपासणीचा अहवाल धडकला. वृध्दाश्रमातील तब्बल १८ वृध्द व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या. पण, त्यानंतर सर्वात मोठी अडचणी उभी राहिली ती उपचाराची. या निराधार ज्येष्ठांकडे ना आधारकार्ड ना इतर कुठलेही कागदपत्र नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी अडचणी येऊ लागल्या. हा प्रकार डॉ. प्रताप जाधव यांना कळताच, त्यांनी त्यांच्या परिचयातील सेवारथ परिवारातील डॉ. रितेश पाटील यांनी कळविले. पाटील यांच्यासह सेवारथ परिवारातील डॉ. नीलिमा सेठीया, दिलीप गांधी व कवी कासार यांनी क्षणाचा विलंब न करता पुढाकार घेऊन उपचारासाठी हालचाली सुरू केल्या.उपचारासाठी तात्काळ दाखला द्या...निराधार वृध्दांकडे कुठलेही कागदपत्र नसल्यामुळे उपचार मिळण्यास अडचणी येत असल्याची बाब ही सेवारथ परिवारतील सदस्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दुपारी कळविली. बाधित वृध्द मंडळीना तात्काळ उपचार मिळावे म्हणून जिल्हाधिकारी यांनी तात्काळ तहसिलदार यांना संपर्क साधून उपचारासाठीचा दाखला देण्याच्या सूचना केल्या. तहसिलदारांनी दाखला तयार करून तो सेवारथ परिवाराकडे सोपविला. नंतर सेवारथ परिवारातील कवी कासार यांनी पाच रूग्णवाहिकांच्या माध्यमातून काहींना पॉलिटेक्निक येथे तर काही इकरा येथे उपचारार्थ हलविले.बेड खाली नसल्यामुळे तासभर ताटकळले बाधितबेड खाली नसल्यामुळे सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आवारात तासभर सहा ते सात बाधित वृध्द मंडळी ताटकळली. हा प्रकार डॉ. रितेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना लक्षात आणून दिला. जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन गोदावरी रूग्णालयात बाधितांच्या उपचाराचा मार्ग मोकळा केला. गोदावरी रूग्णालयात बेड खाली असल्यामुळे रात्री उर्वरित बाधित वृध्दांना रूग्णवाहिकेतून हलविण्यात आले.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसJalgaonजळगाव