शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:56 IST

दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

जळगाव : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९च्या अनुषंगाने १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत अद्यापही मतदार नोंदणी न झालेल्या नागरिकांना मतदार यादीत आपले नाव नोंदविता यावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने आणखी संधी दिली असून यासाठी दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १५ ते ३० जुलै २०१९ या दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर झाला असून याबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गाडीलकर बोलत होते. याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, निवडणूक तहसीलदार सुरेश थोरात, नायब तहसीलदार कळसकर आदी उपस्थित होते.मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रममतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तसेच मयत, दुबार, स्थलांतरीत, मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १५ ते ३० जुलै २०१९ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. याअनुषंगाने मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमाचे विविध टप्पे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार १५ जुलै रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात आली आहे. तर १५ ते ३० जुलै या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे. २१ व २१ आणि २७ व २८ जुलै या तारखांना मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ५ आॅगस्ट रोजी पर्यवेक्षक, सहाय्यक मतदार नोंदणी, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून मतदार याद्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून तपासणी होवून आलेले दावे व हरकती १३ आॅगस्ट २०१९ रोजी निकाली काढण्यात येणार असून १६ आॅगस्ट रोजी उपजिल्हाधिकारी निवडणूक, जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार यादी निरीक्षक यांच्याद्वारे मतदार याद्यांची तपासणी, डाटाबेसचे अद्यावतीकरण, परवणी याद्यांची छपाई इत्यादी कामे पूर्ण करण्यात येणार असून १९ आॅगस्ट रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.मतदार याद्यांच्या दुसºया विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी सक्रीय सहभाग नोंदवून विधानसभा सार्वत्रिक निवडणूकसाठी मतदार याद्या अचूक व परिपूर्ण होण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव