पावसाचा सांगावा, दिवसभर ऊन सावल्यांचा खेळ

By Admin | Updated: May 30, 2017 16:28 IST2017-05-30T16:28:29+5:302017-05-30T16:28:29+5:30

तापमान 40 अंशावर येणार : 4 जून रोजी काही भागात पावसाची शक्यता

Speak rain, play wool shadows throughout the day | पावसाचा सांगावा, दिवसभर ऊन सावल्यांचा खेळ

पावसाचा सांगावा, दिवसभर ऊन सावल्यांचा खेळ

>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि. 30- शहरासह लगतच्या भागात मंगळवारी सकाळपासून ऊन सावल्यांचा खेळ सुरू झाला. उकाडा वाढल्याने घामाच्या धारा लागत होत्या. यातच लवकरच पाऊस येण्याचे संकेत असून, 4 जून रोजी जिल्हाभरात काही भागात पाऊस बरसू शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावर व्यक्त करण्यात आला आहे. 
ऊन सावल्यांचा खेळ सतत सुरू असल्याने मंगळवारी तापमानातही किंचीत घट झाली. सोमवारी कमाल तापमान 42.8 एवढे होते. तर मंगळवारी 42.4 एवढे कमाल तापमान असल्याची नोंद ममुराबाद येथील कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र केंद्रात झाली. 
आगामी आठवडा ढगाळ वातावरणाचा
आगामी आठवडाभर ढगाळ वातावरण कायम राहील. रोहिण्या बरसतील, अशी स्थिती आहे. यामुळे तापमानातही घट होणार असून, ही स्थिती पावसासाठी अनुकूल असल्याचे हवामानशास्त्र केंद्राने म्हटले आहे. 
तापमानात घसरणीचा अंदाज
भारतीय हवामानशास्त्र विभागाने आगामी काही दिवसांमधील तापमानासंबंधीदेखील अंदाज व्यक्त केला आहे. त्यात 31 रोजी 42, 1 जून रोजी 41.8, 2 रोजी 41.3, 3 रोजी 40 अंश सेल्सीअसर्पयत कमाल तापमान खाली येऊ शकते, असा अंदाज आहे. 
आर्द्रतेचा कहर
ऊन सावल्यांचा खेळ अधिक उष्णतेपासून काहीसा दिलासा देणारा असला तरी आद्र्रतेमुळे उकाडा प्रचंड वाढला. घामाच्या धारा लागत होत्या. अशात पंख्यांशिवाय काम करणे अशक्य झाले होते. जशी स्थिती शहरांमध्ये उकाडय़ाबाबत होती, तसेच चित्र ग्रामीण भागातही होते. अनेक मजूर, शेतकरी सकाळी 6.30 वाजताच शेतात जात असून, दुपारी 12 पूर्वी घरी परतत असल्याची माहिती मिळाली. 
वा:याचा वेग व दिशा पावसासाठी अनुकूल
सध्या पश्चिमेकडून अधिक गतीचे वारे वाहत आहेत. त्यात फारसा बदल नाही. तसेच कुठलेही कमी दाबाचे क्षेत्र अद्याप निर्माण झालेले नाही. लू वा:यांचा प्रभाव ओसरला आहे. हे सर्व संकेत आगामी काही दिवसात खान्देशात पाऊस बरसण्याचे असल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. 

Web Title: Speak rain, play wool shadows throughout the day