शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ज्वारी बियाण्याची काळ्याबाजारात विक्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 18:26 IST

 मागणी असलेल्या ज्वारीच्या एका वाणाची  काळ्याबाजारात जादा भावाने विक्री होत आहे.

ठळक मुद्देकधी संपणार व्यथा एकीकडे बियाण्याची तूट तर दुसरीकडे शेतकऱ्यांची लूट

अशोक परदेशीभडगाव : शहरासह तालुक्यात  मागणी असलेल्या ज्वारीच्या एका वाणाची  काळ्याबाजारात जादा भावाने विक्री होत आहे. शहरासह तालुक्यात काही कृषी केंद्रचालक लूट करीत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. एकीकडे बियाण्याची तूट तर दुसरीकडे लूट होत असल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे. खरीप हंगामात ज्वारीचे पेरणी उद्दिष्ट ३२८६ हेक्टर होते. शेतकऱ्यांनी ज्वारीच्या विविध वाणांची पेरणी केली होती. यात ज्वारीच्या एका कंपनीचे वाण चांगले उत्पन्न देणारे ठरले आहे. ज्वारीचा चाराही जनावरांना चांगला उपयोगी पडतो. काही शेतकऱ्यांना सततच्या पावसाने ज्वारीच्या कणसातील दाणे काळे पडल्याने नुकसानही झाले. मात्र या ज्वारीचे दादरप्रमाणे धान्य आहे. त्यामुळे खरीप हंगामाप्रमाणे या रब्बी हंगामातही बहुतांश शेतकऱ्यांनी या ज्वारी पिकाची पेरणी केली आहे. भडगाव तालुक्यात कृषी विभागास ज्वारी पेरणीचे उद्दिष्ट  फक्त ९११ हेक्टर क्षेत्र आहे. मात्र आतापर्यंत तालुक्यात एकृण २८३४ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीच्या पिक पेरण्या झाल्या आहेत. आता जामदा उजवा व डावा कालव्यांना नुकतेच प्रशासनाने रब्बी हंगाम पिक पेरण्यांसाठी पाण्याचे ३ आवर्तने जाहीर केलेले आहेत. त्यामुळे भडगाव तालुक्यात आतापर्यंत रब्बी हंगामात ज्वारी पिकाची सर्वाधिक पेरणी झाली आहे अन अजूनही ज्वारी पेरणी  क्षेत्रात लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. ज्वारीला चांगला भाव मिळेल जनावरांना चारा मुबलक मिळेल. खर्ज कमी मेहनत कमी यामुळे शेतकऱ्यांना आशा आहे. दरम्यान, ज्वारी बियाण्याच्या एका वाणाची मागणी जास्त आहे. खरीप हंगामात मागेही तीन किलो ज्वारी बियाण्याची थैली बाजारात ५३० रुपये मूळ किमतीला विक्री झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र सध्या तर १२०० रुपये ते १५०० रुपये जादा भावाने पावती न देता सर्रास दुकानदार काळया बाजारात विकत असल्याची शेतकरी वर्गात चर्चा होत आहे.  या बियाण्याचा तुटवडा निर्माण करुन काळयाबाजारात विक्रीतून शेतकऱ्यांची काही दुकानदारांकडून लूट होत असल्याची चर्चा  आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. 

भडगाव शहरासह तालुक्यात एका ज्वारीचे बियाणे काही कृषी केंद्रांवर जादा भावाने शेतकऱ्यांना विक्री होत असल्याची माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांना पावतीही दिली जात नाही. तरी अशी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधीत कृषी केंद्रधारकांची तक्रार करावी. पावती असो वा नसो तक्रार प्राप्त झाल्यास संबंधीत कृषी केंद्रचालकाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. -बी.बी.गोरडे, तालुका कृषी अधिकारी, भडगाव

टॅग्स :FarmerशेतकरीBhadgaon भडगाव