बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील सोनोटी येथील वसंत तुकाराम पाटील (४५) या कर्जबाजारी शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना ८ रोजी सकाळी घडली. या आठवड्यातील तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.वसंत तुकाराम पाटील यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांनी वि.का. सोसायटीचे ८५ हजारांपर्र्यंत कर्ज काढून नुकताच उन्हाळी कांदा लावला आहे. दिवसरात्र ते शेतात असत. ७ रोजीही ते घरुन शेतात गेले होते. ८ रोजी सकाळी नऊच्या सुमारास शेताजवळील सोपान पाटील यांच्या शेतातील झोपडीत ते काही तरी विषारी द्रव्य सेवन करून मृतावस्थेत आढळले.सोसायटी व इतर खासगी असे लाख रुपयांपर्यंतचे त्यांच्यावर कर्ज होते. कर्जफेडीच्या विवंचनेत ते रात्रंदिवस शेतातच असायचे, असे कुटुंबियांनी सांगितले. याबाबत बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सोनोटीच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 17:02 IST
बोदवड तालुक्यातील सोनोटी येथील वसंत तुकाराम पाटील (४५) या कर्जबाजारी शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना ८ रोजी सकाळी घडली. या आठवड्यातील तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.
सोनोटीच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
ठळक मुद्देबोदवड तालुका सुन्न आठवड्यातील दुसरी घटना