शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथराव खडसे यांच्या कार्याची धडाडी सून रक्षा आणि कन्या रोहिणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 15:35 IST

आमदार एकनाथराव खडसे यांनी ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिलेत. त्यांनी आपला राजकीय वारस जाहीर केला नसला तरी सून खासदार रक्षा खडसे व मुलगी रोहिणी खडसे खेवलकर हे त्यांचा वसा यशस्वीपणे चालवित आहे.

ठळक मुद्देदोघीनींही स्वत:च्या कर्तृत्वाने आपले अस्तित्व निर्माण आणि सिद्धही केले आहे दोघांची राजकीय वाटचाल खडसेंचा वारसा चालविणारी ठरली आहे.

मुक्ताईनगर (मतीन शेख)मुरब्बी राजकारणी, अभ्यासू व उत्कृष्ट संसदपटू व फर्डे वक्ते अशा अनेक बिरुदांनी राज्यभरात लौकिक असलेल्या आमदार एकनाथराव खडसे यांनी ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिलेत. त्यांनी आपला राजकीय वारस जाहीर केला नसला तरी सून खासदार रक्षा खडसे व मुलगी रोहिणी खडसे खेवलकर हे त्यांचा वसा यशस्वीपणे चालवित आहे.खडसे यांचे राजकीय वारस म्हणून सून खा. रक्षा खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे यांच्याकडे पाहिले जात आहे. खडसेंच्या राजकीय वलयापलीकडे दोघीनींही स्वत:च्या कर्तृत्वाने आपले अस्तित्व निर्माण आणि सिद्धही केले आहे. कोथळीच्या सरपंच, जि.प. सदस्य, आरोग्य सभापती आणि थेट खासदार अशा वाटचालीत प्रत्येक टप्प्यावर खासदार रक्षा खडसे यांनी स्वत:ला यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून सिद्ध केले आहे.खडसे यांच्या धडाडीची छाप रक्षा खडसे यांच्या कामाच्या पद्धतीत दिसून येते. मग नेत्यांकडे काम घेऊन आलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या दाखल्याचे काम असो, की आखाती देशात अडकलेल्या नागरिकाला सोडविण्याचा प्रश्न असो. खासदार रक्षा खडसे यांचा पाठपुरावा जागेवरूनच सुरु होतो. त्यांचा लोकसभेतील कामकाजात सक्रीय सहभाग, अभ्यास यामुळे त्यांनी संसदेत मांडलेल्या प्रश्नांतून कामाची छाप उमटविली आहे. देशातील महिला आणि युवा खासदारांच्या अव्वल रांगेत त्यांचे नाव आहे. अगदी पंतप्रधान यांनी टिष्ट्वटरवर त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. राजकारणात त्या जेवढ्या सक्रीय आहेत. तेवढ्याच कुटूंबाबाबत सजग आहेत. व्यस्त दिनचर्येतून मुलांना व कुटूंबाला ते आवर्जून वेळ देतात.खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे -खेवलकर यांची राजकारणातील एन्ट्री सहकार आणि औद्योगिक क्षेत्रातून झाली आहे. एकेकाळी अडगळीत पडलेल्या मुक्ताई सूतगिरणीचा कारभार हातात घेऊन त्यांनी सूतगिरणीचे चाते फिरविले. एवढेच नाही तर निर्यात दर्जाचे सूत येथे निर्माण होऊ लागले आहे. व्हाईस चेअरमन म्हणून मुक्ताई शुगर अँड एनर्जीच्या निमित्ताने येथील साखर कारखान्याला नवसंजीवनी त्यांनी मिळवून दिली आणि मुक्ताई साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल आज सुरू आहे. अगदी अडीच हजार मेट्रिक टन क्षमता असलेला हा कारखाना आज रोजी पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. तर कारखान्याचा वीजनिर्मिती प्रकल्प यशस्वीपणे सुरू आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामाची छाप उमटवली आहे. तर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कार्य सुरु आहे.आमदार खडसे यांचा वसा घेतलेल्या सून खासदार रक्षा खडसे यांची यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रियता तर सहकार व औद्योगिक क्षेत्रात मुलगी रोहिणी खडसे खेवलकर यांनी स्वत:ला उत्तम प्रशासक सिद्ध केल्याने दोघांची राजकीय वाटचाल खडसेंचा वारसा चालविणारी ठरली आहे.

टॅग्स :Politicsराजकारण