शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

सोनवणे कुटुंबाची तिसरी पिढी जपतेय वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 15:56 IST

आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे हे त्यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व राजकीय, सामाजिक क्षेत्रात करीत आहे.

सुशील देवकरजळगाव : सोनवणे कुटुंबीय आणि राजकारण हे जणू समीकरणच बनले आहे. गेल्या ६४ वर्षांपासून या कुटुंबातील सर्वच प्रमुख सदस्य राजकारणात आहेत. सरपंचपदापासून विधानसभेपर्यंतच्या निवडणुका या कुटुंबाने लढविल्या आहेत. आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे हे त्यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व राजकीय, सामाजिक क्षेत्रात करीत आहे.५९ वर्षांपासून सरपंचपदजळगाव तालुक्यातील सुजदे-भोलाणे हे मूळ गाव असलेल्या या कुटुंबातील तोताराम आवसू सोनवणे यांनी १९५४ ते १९७० या कालावधीत गावचे सरपंचपद भूषविले. त्यांच्या पश्चात त्यांचे द्वितीय चिरंजीव पंडित तोताराम सोनवणे यांनी १९७१ ते १९७५ या कालावधीत, त्यानंतर मुरलीधर तोताराम सोनवणे यांनी १९७६ ते १९८५, वसंत तोताराम सोनवणे यांनी १८८६ ते १९९० या कालावधीत, सिंधू मुरलीधर सोनवणे यांनी १९९० ते १९९५ या कालावधीत, सुनील मुरलीधर सोनवणे यांनी १९९५ ते २००० या कालावधीत, अभिमन्यू सिताराम सोनवणे यांनी २००० ते २००५ या कालावधीत सरपंचपद भूषविले. गेल्या काही वर्षांपासून या कुटुंबातील सुनांकडे हे सरपंचपद आहे. मधली केवळ पाच वर्ष सरपंचपद कुटुंबाबाहेर होते.सोनवणे कुटुंबाने सिताराम तोताराम सोनवणे यांच्या रूपात १९५५ मध्ये जि.प.मध्येही स्थान मिळविले. तत्कालीन ममुराबाद-म्हसावद गटातून ते जि.प. सदस्यपदी निवडून आले होते. पुढील टर्मला त्यांनी जळगाव पं.स.समितीची निवडणूक लढविली. त्यात ते विजयी झाले. एवढेच नव्हे तर पंचायत समितीच्या सभापतीपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली. याच काळात ते जिल्हा बँकेवर तसेच शेतकी संघावरही संचालक होते. १९६५ पासून ते जळगाव कृउबाचे सभापती झाले. सलग १४ वर्षे ते कृउबाचे सभापती होते. त्या काळी कृउबा समितीचे कार्यालय सध्याच्या व.वा.गोलाणी मार्केटच्या जागेवर होते. सिताराम सोनवणे यांच्या प्रयत्नानेच कृउबाला अजिंठा रोडवरील जागा मिळाली. इमारतीचे बांधकाम होऊन त्यांच्या कार्यकाळातच कृउबा या नविन जागेत स्थलांतरीत झाली. आमदार सोनवणे यांचे बंधू शामकांत सोनवणे यांनी तीन वेळा नगरसेवकपद भूषविले असून त्यांच्या पत्नी राखी शामकांत सोनवणे यांनीही नगरसेवकपद तसेच महापौर, उपमहापौरपद भूषविले आहे. आमदार सोनवणे यांचे चुलत बंधू डॉ.अश्विन सोनवणे हे सध्या उपमहापौर आहेत.तिसºया पिढीने गाठले शिखरबळीरामदादा यांचे चिरंजीव प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना समाजकारणाचे व राजकारणाचे बाळकडू घरातून मिळाले. समाजाचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशानेच ते समाजकार्याकडे व राजकारणाकडे वळले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून लौकिक मिळविला. १९८२ मध्ये पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी सचिव पदाची निवडणूकही लढविली. तसेच कॉलेजला असतानाच १९८५ मध्ये नगरसेवकपदाची निवडणूकही लढविली. १९९१ मध्ये ते नगरसेवक म्हणूनही निवडून आले. तसेच नूतन मराठा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही रूजू झाले. त्यानंतर ते तीन टर्म नगरसेवक होते. तत्कालीन आमदार सुरेशदादा जैन यांच्याविरोधात जळगावातून दोन निवडणुका लढविल्या. मात्र पराभूत झाले. २०१४ मध्ये मात्र चोपड्यातून ते सेनेकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव