शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी लांबविल्याचा फोन अन् पोलिसांची भरउन्हात उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 16:02 IST

असेही एप्रिल फुल ! : राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने घेतली फिरकी

ठळक मुद्देचोरटा पकडल्याचे सांगत पोलिसांनीही केले एप्रिल फुल‘एप्रिल फुल’ करणाºया महिला पदाधिका-यांच्या निधनाचे वृत्तराजकीय पक्षाच्या महिला पदाधिका-याने घेतली फिरकी

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१ : १ एप्रिल म्हणजे फिरकी घेण्याचा दिवस अर्थात एप्रिल फुल! रविवारी या एक एप्रिलच्या निमित्ताने शहरात अनेक गंमतीशीर किस्से घडले. रामेश्वर कॉलनीत सोनसाखळी चोरी व ही माहिती पोलिसांना देणाºया राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाºयाचा मृत्यू या दोन गंमतीशीर किस्स्यांनी जळगावकरांची दिवसभर करमणूक झाली.रामेश्वर कॉलनीतील आदित्य चौकात दुचाकीस्वारांनी एका महिलेची सोनसाखळी लांबविल्याची माहिती एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाºयाने एमआयडीसी पोलिसांना दिली. ठाणे अंमलदाराने त्या फोनची दखल घेऊन तत्काळ गुन्हे शोध पथकाला घटनास्थळाकडे रवाना केले. सहायक फौजदार अतुल वंजारी यांचे पथक रखरखत्या उन्हात वर्णनावरून सोनसाखळी चोरांचा शोध घ्यायला लागले. घामाघूम झाल्यानंतरही चोरट्यांचा शोध लागेना. सर्वच ठिकाणाहून माहिती घेतल्यानंतर ‘एप्रिल फुल’ असल्याचे लक्षात आले. या महिलेवर संताप व्यक्त होत असतानाच त्यांच्या निधनाचे वृत्त धडकले.पोलिसांनीही केले एप्रिल फुलरामेश्वर कॉलनीत सोनसाखळी लांबविल्याची माहिती देऊन पोलिसांना भरउन्हात पायपीट करायला लावल्यानंतर चौकशीअंती संबंधित महिलेने एप्रिल फुल केल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनीही त्या महिलेला फोन करुन तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे दोन तासांनी चोरट्यांना शोधण्यात यश आले असून मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. तुम्ही फिर्यादी महिलेला घेऊन पोलीस ठाण्यात या असा निरोप देऊन पोलिसांनीही या महिलेला एप्रिल फुल केले.

टॅग्स :April fool 2018एप्रिल फूल 2018Jalgaonजळगाव