शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भादली रेल्वेस्थानकावर तिसरी रेल्वे लाईन जोडणीसाठी काही गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 19:40 IST

बदलाची नोंद घेऊन नियोजन करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

भुसावळ, जि.जळगाव : मध्यरेल्वेच्याभुसावळ विभागातील भादली रेल्वेस्थानकावर तिसरे रेल्वे लाईन जोडणी तथा स्थानकावर प्रि-नॉन इंटरलॉकिंग व रिमोल्डिंगचे कार्य सुरू होणार असल्याने ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या असून तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.भुसावळ विभागातील भादली स्थानकावर तिसरी रेल्वे लाईन अंथरण्याचे व जोडणीचे काम सुरू आहे. भादली स्टेशन यार्डात रिमोल्डिंगचे कार्य तसेच पि-नॉन इंटरलॉकिंगमुळे भुसावळ स्थानकावरून सुटणाऱ्या काही पॅसेंजर गाड्या ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आलेले आहे.रद्द करण्यात आलेल्या गाड्या अशागाडी क्रमांक ५९०१३ सुरत-भुसावल पॅसेंजर ही गाडी ५ ते ८ दरम्यान, तर परतीच्या ५९०१४ प्रवासात ६ ते ९ दरम्यान रद्द करण्यात आलेली आहे.गाडी क्रमांक ५९०८९ भुसावळ - सुरत पॅसेंजर ही गाडी ६ ते ९ व परतीच्या प्रवासात ५ ते ८ सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आलेली आहे. गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ-सुरत पॅसेंजर ६ ते १० व गाडी क्रमांक ५९०७५ सूरत- भुसावल पॅसेंजर ५ ते ९. गाडी क्रमांक ५११८२ भुसावळ- देवळाली पॅसेंजर ५ ते ९ व परतीच्या प्रवासात ६ ते १०गाडी क्रमांक ५११५४ भुसावळ- मुंबई पॅसेंजर ६ ते ९ परतीच्या प्रवासात ६ ते १० दरम्यान रद्द करण्यात आलेली आहे.या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर- गोंदिया ही गाडी ८ रोजी , क्रमांक ११०४० ही गाडी ९ रोजी प्रारंभीच्या स्थानकांवरून त्यांच्या मार्गात बदल करण्यात आलेले आहे दौंड, अहमदनगर, मनमाड जळगावकडे न येता पूर्णा, अकोलामार्गे वळविण्यात आलेली आहे. तसेच परतीच्या प्रवासातही अकोलावरून भुसावळकडे न येता पूर्णा, मनमाड, अहमदनगर, दौंड अशी जाणार आहे.गाडी क्रमांक १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनल गोरखपूर काशी एक्सप्रेस ही गाडी प्रारंभिक स्थानकापासून ९ सप्टेंबरला सुटणार आहे. मनमाड, पूर्णा, अकोला, वरणगाव, दुसखेडा मार्गे तर गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनल- काशी एक्सप्रेस दुसखेडा, वरणगावमार्गे अकोला, पूर्णा, मनमाड.गाडी क्रमांक १२८३३ अहमदाबाद -हावडा एक्सप्रेस ही गाडी अमदाबादवरून ९ ला सुटणार असून गोदरा, नालदा, उज्जैन, भोपाल, इटारसी, नागपुर तर ७ सप्टेंबर रोजी हावडा वरून सुटणार असून याच्या मार्गात असा राहील नागपूर, इटारसी, भोपाल, उज्जैन, गोधरा..गाडी क्रमांक २२१२९ लोकमान्य टिळक टर्मिनल- इलाहाबाद एक्सप्रेस ही गाडी मुंबईवरून ९ ला सुटणार असून मनमाड, पूर्णा, अकोला, वरणगाव, खंडवा तर गाडी क्रमांक १२१६६ वाराणसी लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस ८ रोजी वाराणसीवरून सुटेल व खंडवा, वरणगाव, अकोला, पूर्णा, मनमाड या मार्गावरून जाणार आहे.या गाड्यांच्या मार्गात बदल तसेच रद्द झालेल्या गाड्यांच्या नोंद प्रवाशांनी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ