शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

जळगावातील डॉक्टरांकडे लुटीसाठी धुळ्याहून आले चोरटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 12:52 IST

दोघांना अटक

ठळक मुद्देअन्य दोघांच्या शोधासाठी पथक रवानाकामावरुन काढून टाकल्याने आला राग

जळगाव : बालरोग तज्ज्ञ डॉ.निषाद यशवंत पाटील यांच्याकडे सव्वा पाच लाखाची लूट केल्याच्या प्रकरणात जाकीर पिरन खाटीक (वय ४०, रा. तांबापुरा) व मास्टर मार्इंड चेतन भागवत सूर्यवंशी (वय २७, रा. वाघनगर) या दोघांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. ही लूट करण्यासाठी जाकीर याने धुळे येथून खास दोघांना बोलावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.डॉ.आचल यांना चाकूचा धाक दाखवून पाच लाख रुपये रोख व दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी लुुटल्यानंतर जाकीर खाटीक त्याचे साथीदार रियाज राजू खाटीक रमजान रहिम शेख (दोन्ही रा.धुळे) या तिघांनी त्याच दिवशी रात्री धुळे गाठले. पैशाची वाटणी झाल्यानंतर जाकीर हा जळगावला परत आला. तर अन्य दोघं गुजरातमध्ये रवाना झाले आहेत. पोलिसांचे एक पथक त्यांच्या मागावर आहे. चेतन याची उज्जैन येथे रेल्वेची परीक्षा असल्याने तो तेथे रवाना झाला होता.चेतन गायब झाल्याने संशयडॉक्टरांशी कोणाचे वैर किंवा कोणी काम सोडले आहे का याची पोलिसांनी माहिती घेतली असता चेतन याला कामावर काढल्याचे समोर आले. त्यानंतर त्याची चौकशी केली असता तो शहरातून गायब झाल्याचे लक्षात आल्याने त्याच्यावर संशय बळावला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी स्वत: रात्री एक वाजता घटनास्थळाला भेट दिली होती. जिल्हा पेठचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहायक निरीक्षक संदीप आराक, उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी, राजू मेढे, रवींद्र नरवाडे, छगन तायडे, प्रशांत जाधव, शेखर जोशी, हेमंत तायडे व प्रतिभा पाटील यांच्या पथकाने रात्रंदिवस या तपासात झोकून दिले होते. उपनिरीक्षक सूर्यवंशी यांना खबऱ्यामार्फत या गुन्ह्याचा धागा मिळाला अन् तपासात पुढे हा धागा गवसलाही.मास्टर मार्इंडला मिळाले १० हजार; १ लाख १५ हजार जप्तमास्टर मार्इंड असलेल्या चेतन याच्या बॅँक खात्यात जाकीर याने दहा हजार रुपये जमा केले आहेत. जाकीर याने पोलिसांना आतापर्यंत एक लाख १५ हजार रुपये काढून दिले आहेत. जास्त रक्कम फरार झालेल्या दोघांकडे असल्याचे जाकीर सांगतो. दरम्यान, चेतन उज्जैन येथून येताच त्याला ताब्यात घेण्यात आले तर जाकीर याला त्याच्याआधीच ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी वैद्यकिय तपासणीनंतर दोघांना अटक करण्यात आली.कामावरुन काढून टाकल्याने आला रागयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चेतन सूर्यवंशी हा या गुन्ह्णातील मास्टर मार्इंड आहे. डॉ.निषाद पाटील यांच्याकडे तो जनसंपर्क अधिकारी म्हणून कामाला होता. मात्र रुग्ण आणत नसल्याच्या कारणावरुन डॉक्टरांनी त्याला कामावरुन काढले होते. हा राग मनात असल्याने बदला घेण्यासाठी चेतन याने डॉक्टरांना लुटण्याचा डाव आखला होता.दसºयाच्या दिवशी रात्री रचला डावडॉक्टरांना अद्दल घडविण्याचा विचार चेतनच्या डोक्यात सतत येत होता. त्यासाठी आठ महिन्यापूर्वी चेतन याने तांबापुरातील जाकीर याला लुटीचा डाव सांगितला होता. डॉक्टरांकडे रोज व आठवड्याला किती पैसे येतात, घरी कोण असते याची इत्यंभूत माहिती त्याला होती. आठ महिने शांत राहिल्यानंतर दसºयाच्या रात्री पाच जणांनी मिळून डाव रचला. त्यात चेतन व जाकीर हे दोन्ही होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव