शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

समाजाने ठरवलं अन् कुटुंब पुन्हा उभं राहिलं! दिव्यांग मुलांना मिळाला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 06:29 IST

कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने पातोंडा येथील गोकुळ भिल आणि कदमबाई भिल यांच्यासमोर संकटांचे डोंगर निर्माण झाले होते. एक वेळ अशी आली की, घरातील तीनही मुले भुकेने व्याकुळ होत. मात्र घरात काहीच नसल्याने चार दिवस चूल पेटली नाही.

- जिजाबराव वाघलोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव ( जळगाव) : समाजाने दातृत्वाची ओंजळ धरली तर कोरोना महामारीतही कुटुंब पुन्हा उभे राहू शकते, याचा प्रत्यय चाळीसगावपासून अवघ्या आठ किमी अंतरावर असणाऱ्या पातोंडा या गावातील कुटुंबाला आला. अनेकांच्या दातृत्वामुळे येथील गोकुळ भिल व कदमबाई भिल या दांपत्यासह तीन दिव्यांग मुलांचेही पुनर्वसन करण्यात यश आले आहे. पिचलेल्या या कुटुंबाला हक्काचा निवारा तर मिळालाच, सोबत रोजगारही उपलब्ध झाला आहे. सोमवारी भिल दांपत्याला दहा शेळ्या सुपुर्द करण्यात आल्या.

 कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने पातोंडा येथील गोकुळ भिल आणि कदमबाई भिल यांच्यासमोर संकटांचे डोंगर निर्माण झाले होते. एक वेळ अशी आली की, घरातील तीनही मुले भुकेने व्याकुळ होत. मात्र घरात काहीच नसल्याने चार दिवस चूल पेटली नाही. ही स्थिती कळताच या कुटुंबासाठी स्वयंदीप दिव्यांग भगिनी मंडळाच्या प्रमुख मीनाक्षी निकम यांनी सोशल माध्यमावर मदतीचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत बीडीओ नंदकुमार वाळेकर यांनी भिल कुटुंबाचे पुनर्वसन करत त्यांना दत्तक घेतले.  वाळेकर यांनी या कुटुंबाला शासनाच्या मदतीची गरज पडू नये असा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी समाजही पुढे आला. सैनिकांच्या ग्रुपने भिल कुटुंबाचे पडके घर उभारून दिले, तर दीपक निकम या वीज कर्मचाऱ्याने थकीत वीजबिल भरून घरात विजेचा प्रकाश पसरवला. काहींनी धान्य व किराणा भरून दिला. वर्षभर पुरेल इतके किराणा सामानही मिळाले आहे.

‘लोकमत’चाही खारीचा वाटागोकुळ भिल यांच्या दयनीय परिस्थितीचा आढावा ‘लोकमत’नेही मांडला होता. त्यामुळे समाजमनाच्या संवेदना पाझरल्या. कुटुंबाच्या पुनर्वसनात ‘लोकमत’चाही खारीचा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया नंदकुमार वाळेकर व मीनाक्षी निकम यांनी व्यक्त केली.मी माणसांच्या रूपात आज देव पाहत आहे. कोरोनात रोजगार बुडाल्यानंतर निराश झालो होतो. तीन दिव्यांग मुलांसह पत्नीचे पोट कसे भरायचे, हा प्रश्न डोंगराएवढा झाला होता. घर पडून गेले होते. वीज नव्हती. आज देवरूपी माणसांनी आम्हाला नव्याने जगण्याची ऊर्जा दिली आहे.    - गोकुळ भील, पातोंडा, ता. चाळीसगाव.