शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आयटीसह सर्वच क्षेत्रात मंदीची दाहकता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:59 IST

विजयकुमार सैतवाल । जळगाव : तंत्रज्ञानात झपाट्याने होणाऱ्या बदलामुळे अनेकांच्या हातचे काम जात आहे. आगामी काळात आयटीसह सर्वच क्षेत्रात ...

विजयकुमार सैतवाल ।जळगाव : तंत्रज्ञानात झपाट्याने होणाऱ्या बदलामुळे अनेकांच्या हातचे काम जात आहे. आगामी काळात आयटीसह सर्वच क्षेत्रात मंदीची दाहकता आणखी वाढणार आहे, असे संकेत नामवंत लेखक व आय.टी. तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.गोडबोले हे रविवारी एका कार्यक्रमासाठी जळगावात आले असता त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्या वेळी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवादप्रश्न - तंत्रज्ञानाने आयटी क्षेत्रात बदल जाणवत आहे का?उत्तर - हो मोठा बदल झाला आहे. तंत्रज्ञानात आज मोठ्या वेगाने बदल होत आहे. त्यानुसार समाज असो अथवा व्यक्ती या प्रत्येकाने स्वत:ला बदलले नाही तर तो बाजूला फेकला जाईल, नवतंत्रज्ञान न स्वीकारल्याने अनेक मोठ्या कंपन्या बाहेर फेकल्या गेल्या आहेत, त्यामुळे बदल न स्वीकारणाऱ्यांची आज काय स्थिती आहे, हे सर्वांसमोर आहे.‘आयटी सिटी’ म्हणून बंगळुरु पाठोपाठ पुण्याचाही झपाट्याने विकास झाला. मात्र तेथेही आज या क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.प्रश्न - तंत्रज्ञानामुळे रोजगाराची काय स्थिती आहे?उत्तर - देशात मंदी आहेच, यात काही शंका नाही. त्या तुलनेत आयटी क्षेत्रात ती कमी आहे. या क्षेत्रातील प्रोग्रामिंग, टेस्टींगमधील नोकºया कमी झाल्या आहेत. यात आता दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान येत असल्याने भविष्यात अजून ६७ टक्के नोकºयांवर गडांतर येण्याची भीती आहे.प्रश्न - तंत्रज्ञानामुळे वाचन संस्कृतीवर काही परिणाम होत आहे का?उत्तर - सध्या वाचन कायम आहे, मात्र यामध्ये साहित्य वाचन राहिले नसून सोशल मीडियावर व्हायरल होणाºया ‘पोस्ट’चे वाचन होत आहे. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग होणे अपेक्षित असताना जो-तो साध्या-साध्या गोष्टी सोशल मीडियावर टाकतो व ते वाचले जाते. त्यामुळे दर्जेदार वाचन कोठे राहिले आहे?.तंत्रज्ञानाला माझा विरोध नाही. मात्र त्याचा योग्य वापर केला जावा. अन्यथा सध्याची स्थिती पाहिली तर या सोशल मीडियामुळे भावी पिढीचे भवितव्य अंधकारमय होण्याची चिन्हे आहे.प्रश्न - विविध क्षेत्रात मंदी येत असल्याने संगीत, कला, साहित्य हे क्षेत्र तरुणाईला खुणावत आहे का?उत्तर - कोणते क्षेत्र कसे आहे, या विचार करीत पैशासाठी काम करू नये. त्यापेक्षा सुखी, आनंदी आयुष्यासाठी आपल्याला जे आवडेल ते काम करा. तुमच्याकडे काय आहे, त्यापेक्षा तुम्ही कसे आहात हे ओळखा.प्रश्न - ‘मनात’, ‘अर्थात’, ‘मुसाफीर’ असे वेगळे नावेच आपण पुस्तकासाठी का निवडतात?उत्तर - ही नावे मला अचानक सुचतात. मुळात मला एक शब्द असणारेच नावे आवडतात. त्यामुळे अशी नावे निवडतो.प्रश्न - आगामी कोणते पुस्तक येणार आहे?उत्तर - ‘रक्त’, ‘व्हिटॅमिन’ यासह कायद्याच्या इतिहासाबद्दल ‘माय लॉर्ड’, विज्ञानावर आधारीत ‘सूक्ष्मजंतू’ ही पुस्तके येणार आहेत. या सोबतच आगामी पाच वर्षात किमान २० उत्कृष्ट दर्जाची पुस्तके वाचकांच्या हाती देण्याचा मनोदय आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव