जामनेर, जि.जळगाव : शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीत वाकी नदीला आलेल्या पुरात वाकी गावातील पुलाचा स्लॅब वाहून गेला. जामनेर पाळधी स्त्यावर गेल्या वर्षभरात वाहतूक वाढल्याने या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहून गेलेल्या स्लॅबवर मुरुम टाकला आहे.पाळधी रस्त्यावरील दोन मोऱ्या, केकतनिंभोरे गोंडखेल रस्त्यावरील व देवळसगाव जवळील सूर नदीवरील मोऱ्यांचे बांधकाम करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे येथील उपविभागीय कार्यालयातून मिळाली.जामनेर शहरातील कांग नदीवरील पूल पाडून या ठिकाणी उंच पूल बांधणे प्रस्तावित आहे. पुरा ते भुसावळ चौफुली या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने या पुलाची उंची वाढविण्याबरोबरच रुंद पूल बांधणे गरजेचे आहे.
जामनेर तालुक्यातील वाकी नदीवरील पुलाचा स्लॅब पुरात वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 18:17 IST
शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीत वाकी नदीला आलेल्या पुरात वाकी गावातील पुलाचा स्लॅब वाहून गेला. जामनेर पाळधी स्त्यावर गेल्या वर्षभरात वाहतूक वाढल्याने या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहून गेलेल्या स्लॅबवर मुरुम टाकला आहे.
जामनेर तालुक्यातील वाकी नदीवरील पुलाचा स्लॅब पुरात वाहून गेला
ठळक मुद्देगेल्या वर्षभरात वाढली वाहतूकपुलाची उंची वाढविण्याबरोबरच रुंद पूल बांधणे गरजेचे