शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

संपामुळे जळगाव जिल्हावासीयांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 9:59 PM

मेडिकल बंदमुळे रुग्णांची फिराफीर

जळगाव : खाजगीकरणाला विरोध, सरकारचे कामगार विरोधी धोरण याविरुद्ध देशव्यापी संपात टपाल, बँक कर्मचारी, असंघटित कामगार, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी, गटप्रवर्तक सहभागी झाल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम होऊन जिल्हावासीयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बँकांमधीन पैसे काढता येईना की एटीएममध्ये पैसे उपलब्ध होत नसल्याने बँक ग्राहकांचे हाल होत आहे. या सोबतच औषधी विक्रेत्यांनी दुपारपर्यंत पुकारलेल्या बंदमुळेही रुग्णांचे हाल झाले. ९ रोजीदेखील संप सुरू राहणार आहे.जामनेरविविध मागण्यांसाठी बँक अधिकारी व कर्मचाºयांनी पुकारलेल्या बंदमध्ये शहरातील दोनच बँका सहभागी झाल्याने ग्राहक सेवेवर विशेष परिणाम जाणवला नाही. सेंट्रल बँक व बँक आॅफ महाराष्ट्रचे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने या दोन्ही बँकेतील खातेदार ग्राहकांची मात्र कुचंबणा झाली. स्टेट बँक, आयडीबीआय, युनीयन बँकेत व्यवहार सुरळीत सुरू होते. उद्या ९ रोजी देखील संपात सहभागी होणार असल्याचे या दोन्ही बँकांकडून सांगण्यात आले.एरंडोलअसंघटीत कामगार, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी, गटप्रवर्तक हे मंगळवारी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध देशव्यापी संपात सहभागी झाले.त्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. बँक कर्मचारी, टपाल विभागाचे कर्मचारी हेसुद्धा संपात सहभागी झाल्यामुळे बँक व्यवहार व टपाल वितरण व्यवस्था ठप्प झाली. परिणामी ग्राहक व नागरिकांची गैरसोय झाली. औषध विक्रेत्यांचा दुपारी तीन वाजेनंतर औषध दुकाने खुली झाली. औषध विक्रेता संघटनेचे तालुका अध्यक्ष कैलास ज्ञाती यांनी हा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.धरणगावधरणगाव, पिंप्री, सोनवद, पाळधी यासह तालुक्यातील सर्वच टपाल कार्यालयातील व बीएसएनएल विभागाचे कर्मचारी कर्मचारी संपावर असल्याने टपाल दोन्ही विभागाची कामे खोळबंले. धरणगाव, अमळनेर, व पारोळा या अमळनेर उपविभात येणाºया ९३ टपाल कार्यालयातील एकूण ७० कर्मचारी संपात सहभागी झाले. तसेच भारतीय दूरसंचार कार्यालयातील सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. मात्र धरणगाव तालुक्यातील बँकांचे व्यवहार सुरळीत सुरु होते. धरणगाव शहरासह तालुक्यातील ६० औषधे दुकाने बंद होत्या.भडगावशहरासह तालुक्यातील टपाल कर्मचाºयांच्या संपामुळे महत्त्वाचे कागदपत्र, मनीआॅर्डर, नोकरीचे आॅर्डर, शेतकºयांचे शासकीय अनुदान यासह विविध कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे. भडगाव शहरात राष्टÑीयकृत बँकांचे कामकाज सुरळीत सुरू होते. कोणतीच कर्मचारी संघटना संपात सहभागी झाले नव्हते.अमळनेरसर्व कर्मचारी कृती समितीचे १५५ कर्मचारी संपावर उतरले आहेत. महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपन्यांतील वीज कर्मचारी संपात सहभागी आहेत.बोदवडसकाळ पासूनच औषध विक्रेत्यांनी औषध विक्रीचे दुकान दुपार पर्यंत बंद ठेवत निषेध व्यक्त केला. या बंद मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.भुसावळभुसावळ विभागात सर्व संघटनांचे ९० टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. शासनाच्या कर्मचारी धोरणाविरोधात ८ आणि ९ जानेवारी असे दोन दिवस टपाल कर्मचारी संपावर आहेत.मुक्ताईनगरतालुका व शहरात टपाल सेवा वगळता अन्य सर्व क्षेत्रातील सेवा सुरळीत सुरू होत्या. विशेष म्हणजे बँकिंग सेवा सुरळीत होती तर दुसरीकडे औषध विक्री दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आले होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव