शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

सिंहगड : एक रोमांचक अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:30 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘पर्यटन’ या सदरात जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयातील प्रा.जयंत इंगळे यांनी सिंहगडाचे सांगितलेले अनुभव.

पावसाळ्यातील ते दिवस होते. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही सिंहगड सफर करण्याचे ठरविले. त्यावेळी मी एम.ए.च्या शेवटच्या वर्षाला होतो. शिक्षणानिमित्त पुण्यालाच रहायला होतो. त्यामुळे सिंहगडला जाणे सोयीचे होते. पुण्यावरून सिंहगड २५ कि.मी. व दळणवळणाची साधेनही भरपूर. आम्ही सुट्टीचा दिवस निवडून सिंहगडकडे आगेकूच केली. पुण्याहून बसने सुरू केलेल्या या प्रवासात आम्ही स्वारगेट-खडकवासला मार्गे सिंहगडच्या पायथ्याशी येऊन पोहचलो. सिंहगड किल्ला हा सह्याद्री पर्वताच्या भक्कम अशा शिखरावर सुमारे ४४०० फुटांवर स्थित आहे. आम्ही सिंहगड ट्रेकिंग करीत सर करण्याचे ठरविले. सकाळी १० वाजता आम्ही सिंहगडच्या पायथ्यापासून आमचा कठीण प्रवास सुरू केला.सुरुवातीला सहज पाऊल टाकत आम्ही सह्याद्रीची उंची हळूहळू चढत होतो. १०० मीटर उंचीवर गेल्यावर झपझप चालणारी आमची पाऊले मंदावत गेली. सह्याद्रीचा चढ हा तीव्र आहे. अशा तीव्र चढावर आपल्या शरीरातील ऊर्जा ही चढताना प्रचंड प्रमाणात खर्च होते. आमच्या पायांना पेटके आलेले होते. तेव्हा आम्ही थोड्या-थोड्या अंतराने विश्राम करीत चढायचे ठरविले, मध्ये-मध्ये उतारावर छोट्याशा जागेवर मांडलेल्या ताकाच्या स्टॉलने आम्हाला दिलासा दिला. पेलाभर ताक पिऊन आम्ही पुन्हा चढाईला लागायचो.या प्रवासात अनेक रंगीत रानफुले, वेगवेगळ्या आकारांची व रंगांची फुलपाखरे, दऱ्या-खोºया दृष्टीस पडत होते. यामुळे मनाला, शरीराला आलेला थकवा कमी होण्यास सहाय्य मिळे. सलग दोन-अडीच तास सततची चढ करीत आम्ही अवघड अशा सिंहगडला गवसणी घातली. एवढ्या उंचीचा चढ चढून गेल्याबद्दल आम्हाला विलक्षण आनंद झाला व स्वत:चा अभिमानही वाटला. महाराष्ट्राचा अभिमान व अस्मिता, इतिहासाची पाने सुवर्ण व समृद्ध करणाºया माझ्या छत्रपती शिवरायांची आठवण मनात तरळून गेली. उंच, कपाºयात व प्रतिकूल शिखरावर असलेल्या अशा किल्ल्याहून राजांनी मावळ्यांना घेऊन किती कठीण युद्धे जिंकलेली आहेत. या विचाराने अंगावर काटा येतो.चढल्याबरोबर आम्हाला दृष्टीस पडला तो पुणे दरवाजा. या दरवाजातून आत प्रवेश करून आम्ही सिंहगडची खरी सफर सुरू केली. या किल्ल्याचे दुसरे नाव ‘कोंढाणा’ असेही आहे. सिंहगड किल्ला म्हटला म्हणजे तानाजी मालुसरे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ‘आधी लगीन कोंडाण्याचे, मग रायबाचे’ अशी शाश्वती देऊन, मोजक्या, मावळ्यांना सोबत घेऊन अखेरपर्यंत झुंज देत सिंहगड सर करणाºया या वीरांचे स्मारक या ठिकाणी बांधलेले आहे.ज्या उदेभान या मोगलांच्या अधिकाºयाला संपवून तानाजीने सिंहगड जिंकवून दिला, त्यातही स्मारक कल्याण दरवाजामागे स्थित आहे. उदेभानच्या स्मारकापुढून समोरच्या टेकडीवरून उतरून आपण ‘झुंजार बुरुजावर’ पोहचतो. किल्ला परिसराच्या दक्षिण टोकाला ‘झुंझार बुरुज’ आहे. हा बुरुज अनेक वर्षांनंतरही भक्कम उभा आहे. या बुरुजाच्या मार्गानेच तानाजी आपल्या मावळ्यांसह चढले. या कडेला ‘तानाजी कडा’ असेही म्हणतात. या ठिकाणाहून राजगड, तोरणा व दूरवर पुरंदर किल्ला दिसतो.तानाजी मालुसरे स्मारकाच्या डाव्या बाजूला छोटा तलाव आहे. या तलावाचे पाणी खूप गार व नितळ आहे. या तलावाच्या डाव्या हाताला ‘देवटाके’ आहे. ह्यात असलेल्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करतात. सिंहगड किल्ल्याच्या परिसरात राजाराम यांचे स्मारक आहे.या स्मारकाचे वैशिष्ट्य असे की, याचा घुमट रंगीत देवळासारखा आहे. तो दिसण्यास सुंदर आहे. पूर्वीच्या काळी बांधलेले अमृतेश्वर भैरव मंदिर व कोंढाणेश्वर मंदिर आपल्याला सिंहगडावर अजूनही चांगल्या स्थितीत दिसतात.