शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टकार्डसाठी एकच संगणक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:16 IST

एस.टी. पासेस : ५ हजार विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी लागणार दोन महिने

जळगाव : एस.टी.महामंडळातर्फे विद्यार्थ्यांनादेखील स्मार्टकार्ड देण्यात येणार आहेत. सध्या स्मार्टकार्डची नोंदणी केल्यावरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक पास देण्यात आहे. या स्मार्टकार्डच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांच्या पहाटेपासूनच रांगा लागत आहेत. मात्र, नोंदणीसाठी एकच संगणक असल्यामुळेसंथ गतीने कामकाज सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण ५ हजार विद्यार्थ्यांना पास मिळण्यासाठी दोन महिने लागणार आहेत.बनावटगिरीला आळा घालण्यासाठी परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक व शासनाच्या पुरस्कारप्राप्त नागरिकांना ‘आधारकार्ड ’ क्रमाकांशी जोडलेले स्मार्टकार्ड दिले जात आहे. यासाठी महिनाभरापासून नवीन बस स्थानकात ज्येष्ठ नागरिकांची स्मार्टकार्डसाठी नोंदणी सुरु आहे. आता ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांनादेखील स्मार्टकार्ड दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दर महिन्याला दिला जाणारा कागदी पास बंद होणार आहे. विशेष म्हणजे स्मार्टकार्डची नोंदणी केल्यावरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक पासेसमिळणार आहेत. विद्यार्थ्यांनाही लवकर पास मिळण्यासाठी महामंडळातर्फे पहाटे सहा ते रात्री नऊपर्यंत नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.एकच संगणक असल्यामुळे संथ गतीने कामकाजस्मार्टकार्डच्या नोंदणीसाठी विद्यार्थी पहाटे साडेपाच पासूनच रांगा लावत आहेत. सकाळी सातपर्यंत १०० ते १५० रांगेत उभे असतात. आॅनलाईनद्वारे एका विद्यार्थ्यांच्या स्मार्टकार्डसाठी १० ते १५ मिनिटे लागतात. बऱ्याचवेळा सर्व्हर संथ गतीने सुरु असल्याचा प्रकार घडत असल्यामुळे एका विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी अर्धातास देखील लागत आहे. त्यात एकच संगणक असल्यामुळे, अतिशय संथ गतीने स्मार्टकार्डची नोंदणी सुरु आहे. दिवसभरात रांगेत उभे असलेल्या २०० ते २५० विद्यार्थ्यांपैकी फक्त ६० ते ७० विद्यार्थ्यांची नोंदणी होत आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करुन, त्यांना पुन्हा दुसºया दिवशी स्मार्टकार्डच्या नोंदणीसाठी बोलावण्यात येत आहे. यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे रांगेत उभे असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. स्मार्टकार्डची नोंदणी लवकर होण्यासाठी ४ ते ५ संगणक उपलब्ध करुन देण्याची मागणी आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव