खडकदेवळा, पाचोरा : पाचोरा येथील पुनगाव रोड परिसरात सागर सुरेश पाटील (पाचोरा) या तरुणाचा मोबाइल पुनगाव रस्त्यावर दुपारी ०२:३० ते ०३:०० वाजेदरम्यान हरवला होता. त्यानंतर त्यावरून पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस नाईक राकेश खोंडे व पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल हटकर हे दोघे मोटारसायकलने पुनगाव रस्त्यावर जात असताना, मोबाइल रस्त्याच्या कडेला पडलेला निदर्शनास आला. त्यावेळी तो मोबाइल बंद होता. हा मोबाइल पोलीस नाईक राकेश खोंडे, विशाल हटकर यांनी तो मोबाइल प्रामाणिकपणाने पाचोरा पोलीस स्टेशनला जमा केला. सागर सुरेश पाटील या तरुणाने मोबाइल हरवल्याची तक्रार पाचोरा पोलिसात दाखल केली होती. पोलिसांनी मोबाइलचे बिल तपासून जमा केलेला मोबाइल पाचोरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विजया वसावे, ठाणे अंमलदार सूर्यकांत नाईक, पोलीस नाईक राकेश खोंडे, प्रशांत पाटील, विशाल हटकर यांच्यासमक्ष तरुणास देण्यात आला.
170721\1622-img-20210717-wa0041.jpg
पोलिसांचा प्रामाणिकपणा सापडलेला मोबाईल केला परत*पोलिसांचा प्रामाणिकपणा सापडलेला मोबाईल केला परत*