शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

 चांदी पुन्हा ८०० रुपयांनी वधारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 20:19 IST

सोन्याच्याही भावात ३५० रुपयांनी वाढ : मागणी वाढत असल्याचा परिणाम

जळगाव : सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा चांदीच्या भावात ८०० रुपयांनी वाढवून चांदी ६६ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात साडेतीनशे रुपयांनी वाढ होऊन सोने ५२ हजार ७०० रुपयांवर पोहोचले. भारतासह जगभरात मागणी वाढत असल्याने सोने चांदीचे भाव वाढत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध व्यवसायावर परिणाम झालेला असताना सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढला व दोन महिन्यांपूर्वी सोने चांदीचे भाव चांगलेच वधारले. त्यानंतर हे भाव काहीसे कमी झाले होते. मात्र नवरात्र उत्सव व विजयादशमी काळात पुन्हा सोने-चांदी महागले. त्यानंतर आठवडाभर भाव काहीसे कमी झाले. त्यानंतर आता गेल्या आठवड्यापासून तर सतत भाववाढ होत आहे.शुक्रवारी एक हजार रुपयांनी वाढ झालेल्या चांदीच्या भावात शनिवारी पुन्हा ८०० रुपयांनी वाढ होऊन चांदी ६६ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. त्याचप्रमाणे सोन्याच्या भावात देखील शुक्रवारी १५० रुपयांनी वाढ झाल्यानंतर शनिवारी पुन्हा ३५० रुपयांनी वाढ होऊन ते ५२ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.डॉलरचे भाव कमी होत असताना सोने-चांदीत वाढएरव्ही भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलरचे भाव वाढले तर सोने-चांदीही महाग होते. मात्र गेल्या पाच दिवसापासून डॉलरचे भाव सतत कमी होत असतानाही सोने-चांदी वधारत आहे. यात २ नोव्हेंबर रोजी डॉलर ७४.४७ रुपये होता. त्यानंतर ६ रोजी तो ७४.०३ व ७ रोजी पुन्हा डॉलरचे दर घसरून ७३.९८वर आले. डॉलरचे हे दर कमी होत असले तरी जगभरात सोने-चांदीला मागणी वाढत आहे. त्यात भारतात सणासुदीचा काळ सुरू झाल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.आठवडाभरात सोने चांदीत झालेली वाढदिनांक सोने चांदी२९ आॅक्टोबर ५१,००० ६१,०००२ नोव्हेंबर ५१,४०० ६२,५००५ नोव्हेंबर ५२,२०० ६४,५००६ नोव्हेंबर ५२,३५० ६५,५००७ नोव्हेंबर. ५२,७०० ६६,३००

टॅग्स :GoldसोनंJalgaonजळगाव