शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

जळगावात मनपा व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 12:45 IST

गाळेधारकांचा आजपासून बंद

ठळक मुद्देविविध संघटनांचा पाठिंबाकोट्यवधींची उलाढाल ठप्पमोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १९ - शहरातील व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ शहरातील गाळेधारक संतप्त झाले असून न्याय मिळावा यासाठी मंगळवार, २० पासून गाळेधारकांकडून बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. शासनाने तत्काळ दखल घ्यावी यासाठी सकाळी ११ वाजता कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवित आपले दुकाने बंद ठेवली, त्यामुळे जळगावातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली.टॉवर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. नेहरू चौक, कोर्ट चौक, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचला. या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.जिल्हा व्यापारी महामंडळाकडून आस्थापना बंदजळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने गाळेधारकांचा प्रश्न लक्षात घेऊन मूक मोर्चाला पाठिंबा दिला असून, मंगळवारी दुपारपर्यंत आस्थापना बंद ठेवण्यात आल्या.या आहेत मागण्यारेडीरेकनरच्या नियमानुसारच प्रचलित भाडेआकारणी करण्याची मागणी गाळेधारकांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मनपा गाळेधारक कोअर कमिटीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.कोट्यवधीची उलाढाल ठप्पशहरातील मुख्य १८ मार्केट बंद राहणार असल्याने, या मार्केटमधून होणारी कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली. फुले मार्केट हे शहरातील कपडा मार्केट म्हणून खान्देशात प्रसिध्द आहे. या मार्केटसह इतर मार्केटदेखील बंद राहणार आहे. प्रशासनाकडून गाळेधारकांच्या हिताचा निर्णय न झाल्यास गाळेधारकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.निषेध म्हणून काळ्या रंगाचे कपडेमोर्चा दरम्यान जळगावकरांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत सर्व खबरदारी घेण्यात येईल अशी माहिती डॉ.शांताराम सोनवणे यांनी दिली. तसेच मनपा कोअर कमिटीचे सर्व सदस्य प्रशासनाचा निषेध म्हणून काळ्या रंगाचे कपडे परिधान करून मोर्चात सहभागी झाले. काही जणांनी काळ््या फिती लावलेल्या होत्या. 

टॅग्स :JalgaonजळगावStrikeसंप