अमळनेर : धुळे चोपडा राज्य मार्गावरील अवैध पार्किंग आणि हातगाड्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याला लाज वाटल्याने त्यांनी पार्किंगसाठी फुटपाथ व साइडपट्ट्यावर मुरूम टाकून रस्ता समतोल केला आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील हायब्रीड ॲन्युटीअंतर्गत झालेल्या रस्त्याच्या कडेला फुटपाथ व साइडपट्ट्या भरण्यात आल्या नव्हत्या. या रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असताना ते ढुंकूनही पाहत नव्हते. वाहनांना धड पार्किंगदेखील करता येत नव्हती. लोकसेवक व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले होते. मात्र, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी वाहनांवर कारवाई सुरू करताच पार्किंग कोठे करावी, याबाबत ओरड होऊ लागली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने साइडपट्ट्यांवर मुरूम टाकायला सुरुवात केली. त्यामुळे आता वाहनांना रस्त्याच्या कडेला जागा मिळणार आहे.