शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शुकशुकाट अन् कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:16 IST

जळगाव : लॉकडाऊनला संपूर्ण शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे शहरातील अनेक रस्ते निर्मनुष्य झाले होते. संपूर्ण जळगावच जणू थांबल्यासारखे ...

जळगाव : लॉकडाऊनला संपूर्ण शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे शहरातील अनेक रस्ते निर्मनुष्य झाले होते. संपूर्ण जळगावच जणू थांबल्यासारखे झाले. काही रस्त्यांवर तुरळक वाहने होती तर विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी दंड केला. त्यामुळे काही वेळातच जवळपास सर्वच रस्ते निर्मनुष्य झाले. जळगावात लॉकडाऊनला एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले.कंजरवाड्यात कसून चौकशीकंजरवाड्यातून जाणारे प्रत्येक वाहन पोलिसांकडून तपासले जात होते. अत्यावश्यक असलेल्या व्यक्तींनाच पुढे सोडले जात होते. चारचाकी वाहनांची कसून चौकशी केली जात होती. या भागात दारुची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने पोलिसांनी खबरदारी घेत एकाही व्यक्तीला बाहेर पडू दिले नाही.पोलीस अधीक्षकांनी घेतले दुचाकीस्वाराला फैलावरपोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले हे सकाळी ११.३० वाजता कार्यालयात येत असताना आकाशवाणी चौकात एक दुचाकीस्वार पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. डॉ. उगले यांनी वाहन थांबवून त्या कर्मचाºयाजवळ गेले. संबंधित तरुण अरेरावी करीत असल्याने डॉ. उगले यांनी त्याला फैलावर घेतले. तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांना बोलावून संबंधित तरुणाला त्यांच्या ताब्यात दिले. या तरुणाविरुध्द १८८ नुसार कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले.परिचारिकांचे मोठे हाललॉकडाऊनमुळे वाहनांना बंदी असल्याने सरकारी व खासगी रुग्णालयात काम करणाºया महिला परिचारिकांचे चांगलेच हाल झाले. बहुतांश परिचारिकांना रुग्णालयापर्यंत सोडण्यासाठी पती, मुलगा किंवा कुटुंबातील सदस्य दुचाकीने जात असताना त्यांना अडविण्यात आले. काव्यरत्नावली चौकात तर परिचारिकांना माघारी पाठविण्यात आले तर काही परिचालकांना दोन किलोमीटरपर्यंत चालत जावे लागले. या परिचारिकांना दुचाकी चालविता येत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या.भाजीपाला मिळालाच नाहीरस्त्यावर तसेच गल्लोगल्ली भाजीपाला विक्रीलाही बंदी होती. प्रशासनाने नागरिकांना घरपोच पुरविण्याची घोषणा केली. मात्र, मंगळवारी दिवसभरात एकाही कुटुंबाला घरपोच भाजीपाला मिळाला नाही. भाजीपाला हवा असेल तर कुठे आणि कोणाशी संपर्क साधावा याचीही माहिती जनतेला देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक कुटुंबाचे हाल झाल्याचे दिसून येत होते.पेट्रोलपंपावर मोजकेच पॉर्इंट सुरुअत्यावश्यक सेवा असल्याने पंपावर मोजकेच पॉर्इंट सुरू ठेवून सेवा देण्यात आली. यासाठी एकेका पंपावर केवळ तीन ते चार कर्मचाºयांनाच बोलविण्यात आले होते. ओळखपत्राशिवाय कोणालाच पेट्रोल मिळत नव्हते. जीवनावश्यक गोष्टी म्हणून भाजीपालाही यावेळी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे कॉलनी व प्रभागांमध्ये हातगाडी व रस्त्याच्याकडेला थांबणारे भाजी विक्रेतेही कुठेच दिसले नाहीत. त्यांनीदेखील घरातच थांबणे पसंत केले. त्यामुळे अनेक परिसरात मंगळवारीशुकशुकाट जाणवत होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव