श्री बालाजी प्रतिष्ठापनेस शोभयात्रेने प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 10:55 PM2019-10-16T22:55:57+5:302019-10-16T22:56:02+5:30

लेझीम पथकाने वेधले लक्ष

Shri Balaji Establishment started with a procession | श्री बालाजी प्रतिष्ठापनेस शोभयात्रेने प्रारंभ

श्री बालाजी प्रतिष्ठापनेस शोभयात्रेने प्रारंभ

googlenewsNext




चोपडा : शहरातील ऐतिहासिक श्री रोकड बालाजी मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापनेस मंगळवारी १५ रोजी दुपारी शोभायात्रेने प्रारंभ झाला. या वेळी भगवे फेटे धारण केलेल्या बालिकांच्या लेझीम पथकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
गांधी चौकातील श्री रोकड बालाजी मंदिरातील मूर्तीची पाद्यपूजा करीत मंगळवारी दुपारी शोभायात्रेला प्रारंभ झाला. श्री बालाजी महाराजांची पाच फुटी पाषाणमूर्ती यात्रेत अग्रभागी ठेवण्यात आली होती. गांधी चौकातून निघून शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. मंदिर परिसरात समिती मार्गदर्शक घनश्याम अग्रवाल व सरोज अग्रवाल यांनी महाआरती करीत यात्रेचा समारोप केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
महिलांची लक्षणीय उपस्थिती
शोभायात्रेत मुलींंच्या लेझीम पथकासह महिलांनीही पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. तसेच अकुलखेडे येथील लक्ष्मीनारायण भजनी मंडळ समूहाने भक्तिगीत गायनातून लक्ष वेधून घेतले.
जलाधिवास उत्साहात
सुरुवातीस श्री बालाजी मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी प्रधानाचार्य हरिषभाई जोशी यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मवृंदांनी देवता स्थापित करीत जलाधिवास विधी पार पडला. १७ रोजी सकाळी यज्ञकर्म, स्नपन, धान्यधिवास, शय्याधिवास हे विधी करण्यात येतील, अशी माहिती मंदिर समितीचे विश्वस्त पंडित अशोक महाराज, पंडित आलोक महाराज यांनी दिली आहे.

Web Title: Shri Balaji Establishment started with a procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.