Shramdan performed on bridegroom before going to bed | बोहल्यावर चढण्यापूर्वी नववधू- वरांनी केले श्रमदान
बोहल्यावर चढण्यापूर्वी नववधू- वरांनी केले श्रमदान


पाळधी ता जामनेर : तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथे गाव पाणीदार करण्यासाठी नव वधू-वरांनी लग्न मंडपात बोहल्यावर चढण्यापूवी गावातील श्रमदानात सहभाग घेऊन गावकऱ्यांचा उत्साह वाढविला.
टाकळी बुद्रुक या गावाने पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेऊन गाव पाणीदार करण्याचा संकल्प केला आहे. ८ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून श्रमदानाला सुरुवात झाली आहे व यात दररोज शेकडोच्या वर महिला व पुरुष सहभागी होऊन स्वयंस्फूर्तीने श्रमदान करीत आहेत. नोकरी निमित्त गेलेले गावकरी,माध्यमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षक या बरोबरच सुट्टीवर आलेले सैनिक कैलास नरवाडे यांनी सुद्धा श्रमदानात आपला सहभाग नोंदवला
या सर्वांचा उत्साह पाहून गावातील युवक गजानन सपकाळ याने गाव पाणीदार झाल्याशिवाय लग्न न करण्याचा निर्धार केला होता परंतु श्रमदानाचे ७०टक्के काम पूर्ण झाल्याने या युवकाने लग्न लागण्यापूर्वी नववधू व वºहाडी मंडळीसह गावाबाहेरील श्रमदानाच्या कार्यात श्रमदान करून हातभार लावत गावकऱ्यांसह पाणी फाउंडेशन टीमचा उत्साह वाढविला.
दररोज शेकडो गावकरी करतात श्रमदान
८ एप्रिल पासून श्रमदानास सुरुवात झाली असून ४५ दिवस ही स्पर्धा चालणार आहे.यात सुरुवातीला अवघड वाटणारे काम आता गावातील सर्व जाती धर्माचे लोक सर्व मतभेद विसरून एकत्र आल्याने सहज शक्य वाटत आहे. श्रमदान करण्यासाठी लागणारे साहित्य हे वेगवेळ्या संस्था व दानशूर व्यक्तीकडून उपलब्ध करून दिले आहे.
 


Web Title: Shramdan performed on bridegroom before going to bed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.