शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...शेंदुर्णीत जन्मदात्रीनेच पोटच्या गोळयाला विकले दोन लाखांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 16:11 IST

बाळ पळविल्याचा मातेकडूनच कांगवा : आईसह चार जणांना पहूर पोलिसांकडून अटक

ठळक मुद्देबाळाची विक्री करीत महिलेने केला बाल न्यायालयात बाळ पळविल्याचा अर्जरेखा व नातेवाईक महिलांमध्ये वाद झाल्यानंतर उघड झाला प्रकार. तब्बल आठ महिन्यानंतर गुन्हा दाखलजामनेर न्यायालयाने सुनावली संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

मनोज जोशीपहूर, जि.जळगाव, दि.१५ : आई म्हणजे आत्मा व परत्मामा यांचे एक रूप आहे. मात्र पैशांसाठी या पवित्र नात्याला सिल्लोड येथील एका मातेने काळीमा फासली. पोटच्या गोळयाला दोन लाखात विक्री करून बाळ पळविल्याचा कांगवाही या आईनेच केल्याचा धक्कादायक प्रकार पहूर पोलिसांनी उघड केला आहे. आईसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे तर एक जण फरार झाला आहे. 

    प्राप्त माहिती नुसार मनीलाल पटेल (रा.गुजरात) यांना अपत्य नसल्याने त्यांचा नातेवाईक रेखा राजूरी गोस्वामी (रा.जय भवानी नगर, सिल्लोड) यांच्याशी संपर्क झाला. या दरम्यान रेखा हिचे बाळ मनीलाल याला देण्यासाठी एप्रिल महिन्यात आपसात बोलणी झाली. त्यावेळी बाळ चार महिन्यांचे होते. या बदल्यात मनीलाल याने रेखाला दोन लाख रुपये देण्याचे ठरले. याला पल्लवी संजय पटेल, संजय भैय्या पटेल, (रा.रालेसना ता.विसनार जि.म्हैसाना गुजरात), व मिना मिलिंद सूर्यवंशी (रा.जय भवानी नगर सिल्लोड जि.औरंगाबाद) या नातेवाईकांनी सहमती दर्शविली. त्यानंतर मनीलाल बाळाला घेऊन त्यांच्या घरी आले.महिलेने केला बाल न्यायालयात अर्जबाळाला दिल्यानंतर संशयित रेखा व काही महिलांमध्ये तू तू- मैं मैं झाली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस येण्याच्या भितीने रेखाने आपले बाळ पळून नेल्याचा तक्रारी अर्ज बाल न्यायालय औरंगाबाद यांच्याकडे केला. या अर्जानुसार सिल्लोड शहर पोलीस तसेच पहूरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, मनोहर पाटील यांनी या महिलेची चौकशी केली. ही महिला शेंदुर्णी येथे कामाला असताना तिने मनीलाल याला बाळाची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले.तब्बल आठ महिन्यानंतर गुन्हा दाखलया प्रकरणातील आरोपी हे परस्परांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे चौकशीअंती सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बजरंग धनसिंग कुरबरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आई रेखा, मनीलाल, मीना सूर्यवंशी, पल्लवी पटेल, संजय पटेल यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३७० (४), (१) बाल विक्री अधिनियम कायद्यांर्तगत पहूर पोलिसात गुरुवारी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आईसह चौघांना अटक केली आहे. तर मनीलाल बाळाला घेऊन फरार आहे.संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडीफरार असलेल्या मनीलाल याला ताब्यात घेतल्यावर या घटनेतील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अटकेतील संशयितांना पोलिसांनी जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेर