शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : विहिरीत पोहण्यासाठी गेले म्हणून मातंग समाजाच्या दोन तरुणांची नग्नावस्थेत धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 13:08 IST

जामनेर तालुक्यातील वाकडी येथील घटना

ठळक मुद्देदोघांना अटकसोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

पहूर, जि. जळगाव - विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेले म्हणून सचिन चांदणे व राहुल चांदणे (रा. वाकडी, ता. जामनेर) या मातंग समाजाच्या दोघं तरुणांना नग्न करून मारहाण करीत त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील वाकडी येथे रविवारी घडला. या प्रकरणी ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार या दोघांविरुद्ध बुधवारी रात्री अटक करण्यात आली.या संदर्भात दुर्गाबाई सांडू चांदणे यांनी बुधवारी रात्री पहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवार, १० जून रोजी सचिन चांदणे व राहुल चांदणे हे दोघे चुलत भाऊ वाकडी गावातील कर्णफाट्यानजीक असलेल्या ईश्वर जोशी यांच्या मालकिच्या विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. त्या वेळी ईश्वर जोशी यांच्यासह प्रल्हाद लोहार यांनी या दोघ चुलत भावांना नग्न करीत जबर मारहाण केली. तसेच त्यांची त्याच अवस्थेत धिंड काढून धमकी दिली.रविवारी हा प्रकार घडल्यानंतर गावातच तो मिटविण्याचा प्रयत्न झाला. मात्र या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर याची वाच्यता झाली व बुधवारी रात्री या प्रकरणी सचिन चांदणे याची आई दुर्गाबाई चांदणे यांनी पहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ईश्वर जोशी व प्रल्हाद लोहार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.पुरोगामी महाराष्ट्रात जातीच्या माध्यमातून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या घटना घडत आहेत. वाकडीची ही घटना समाजसुधारकांचा वारसा आणि संविधानाचा आरसा डावलणाऱ्या आहेत. त्यामुळे नव्याने झालेल्या सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचे प्रबोधन आणि अंमलबजावणी होण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. संविधानाने दिलेला सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी बºयाच अंगाने प्रयत्न करावे लागणार आहे. हे वाकडी येथील घटनेने समोर आले आहे. या प्रकारात आम्ही निषेध करीत आहोत.- अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष, अंनिस.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव