शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

शिवाजीनगर उड्डाणपुलाचा मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:45 IST

जळगावातील ब्रिटीशकालीन शिवाजीनगर उड्डाणपूल जीर्ण झाला

विकास पाटीलजळगावातील ब्रिटीशकालीन शिवाजीनगर उड्डाणपूल जीर्ण झाला आहे. त्या जागी नवीन पूल उभारणे आवश्यक असताना शासन चालढकल करीत आहे. पूल कोसळणार तेव्हा शासनाला जाग येईल की काय? असा सवाल जळगावकरांकडूनउपस्थित होत आहे.जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरासह जळगाव, यावल, रावेर, चोपडा या तालुक्यांना जोडणारा हा अत्यंत महत्वपूर्ण पूल असल्याने त्यावरुन रात्रंदिवस वाहतूक सुरु असते. १०० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने हा पूल जीर्ण झाला असून धोकादायक बनला आहे. त्यावरुन अवजड वाहतूक अव्याहतपणे सुरु राहिल्यास तो कोसळू शकतो व मोठी जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे सुमारे दीड वर्षांपासून या पुलावर क्रॉसबार बसवून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो वाहनधारकांना ८ किलो मीटरच्या फेऱ्याने दुसºया मार्गाने प्रवास करावा लागत आहे. सुरक्षेसाठी नागरिक हात्रास सहन करीत आहे मात्र कधीपर्यंत?या पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्याची जबाबदारी ज्या शासन व प्रशासनावर आहे त्यांच्याकडून चालढकल होत आहे. ही चालढकल जीवावर बेतू शकते. एखादा मोठा अपघात झाल्यानंतर शासन व प्रशासन जागे होत असते. हे आपण नेहमीच अनुभवतो. मुंबईतील एल्फीन्स्टन पुलाचे उदाहरण बोलके आहे. निष्पाप, निरपराध जीव जाण्यापूर्वी शासन व प्रशासनाने दखल घेणे आवश्यक आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलाचा आराखडा तयार झाला. रेल्वे प्रशासन त्यांचे काम करण्यात तयार आहे. मात्र राज्य शासनाचा सार्वजनिक विभाग निर्णय घेण्यास तयार नाही.या पुलाच्या टी आकाराच्या आराखड्यास शिवाजीनगरवासीयांचा विरोध आहे. त्यांचा विरोध न जुमानता टी आकारातच उड्डाणपूल उभारण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव दौºयात जाहीर केले आहे. लोकभावनांचा शासन व प्रशासनाने आदर करणे आवश्यक आहे. मात्र कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. हे योग्य नाही. पूल उभारण्यापूर्वी शिवाजीनगरवासीयांचे म्हणणे जाणून घेणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही त्यांची भूमिका समजून घेण्यात आलेली नाही. त्यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढून पुलाचे काम लवकरमार्गी लावणे आवश्यक आहे. कारण चार तालुक्यातील रहिवाशांना दैना झालेल्या पर्यायी रस्त्यावरुन दररोज ये-जा करावी लागत आहे. पूल उभारण्यात आणखी दीड ते दोन वर्षांचा कालावधी जाईल. तोपर्यंत हालअपेष्टा नागरिकांना सहन कराव्या लागतील.जळगाव जिल्ह्णाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेच सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. पाटील यांची ओळख कार्यतत्पर मंत्री म्हणून आहे. त्यांनी जळगावकरांच्या सोयीसाठी तत्परतेने निर्णय घेणे आवश्यक आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलाचा विषय त्यांच्याच विभागाशी संबधित असल्याने त्यांना हा प्रश्न मार्गी लावण्यात अडचण नसावी. बघूया चंद्रकांत पाटील हे या पुलाचा विषय कधी मार्गी लावतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव