शिवाजीनगर उड्डाणपूल व महामार्ग चौपदरीकरणाचे भिजत घोंगडे, मनपा व महावितरणने हातवर केल्याने शासनाकडे ११ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 11:22 AM2019-08-17T11:22:50+5:302019-08-17T11:23:21+5:30

विद्युत खांब व जलवाहिनी स्थलांतरासाठी शासन निर्णयाची प्रतीक्षा

Shivajinagar flyover and highway intersection Bhitjit Ghongde, Municipal Corporation and Mahavitaran hand over Rs. | शिवाजीनगर उड्डाणपूल व महामार्ग चौपदरीकरणाचे भिजत घोंगडे, मनपा व महावितरणने हातवर केल्याने शासनाकडे ११ कोटींचा प्रस्ताव

शिवाजीनगर उड्डाणपूल व महामार्ग चौपदरीकरणाचे भिजत घोंगडे, मनपा व महावितरणने हातवर केल्याने शासनाकडे ११ कोटींचा प्रस्ताव

Next

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासह महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणारे विद्युत खांब व जलवाहिनी स्थलांतराच्या कामासाठी निधी नसल्याचे कारण सांगत मनपा व महावितरणने हात झटकल्याने हे काम रखडले आहे. दोघांकडून नकार घंटा मिळाल्याने अखेर जिल्हा प्रशासनाच्यावतीने यासाठी शासनाकडे ११ कोटींचे प्रस्ताव पाठविले असून त्याची प्रतीक्षा आता या कामासाठी आहे. जो पर्यंत या प्रस्तावांना मंजुरी मिळत नाही व हा निधी मिळत नाही तोपर्यंत हे काम रेंगाळत राहणार असल्याचे चित्र सध्या यामुळे निर्माण झाले आहे.
शहरातील दोन महत्त्वाचे व जिव्हाळ््याचे विषय असलेले महामार्ग चौपदरीकरण व शिवाजीनगर उड्डाणपूल ही कामे गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्या न कोणत्या कारणांमुळे रखडत आहे. यामुळे एकतर अपघातात अनेकांना जीव गमवावे लागत आहे व दुसरीकडे शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाअभावी परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६)च्या कामासाठी अनेक अडथळ््यांनंतर या कामास मंजुरी मिळाली व डिपीआरही मंजूर झाला. हे सर्व होत असताना त्या-त्या विभागांवर त्यांच्याशी संबंधित कामांची जबाबदारी सोपविण्यात आली. यात मनपाने व महावितरणने त्यांच्याकडील विद्युत खांब स्थलांतरीत करावे, अतिक्रमण हटवावे व इतर कामे सोपविण्यात आली. असे झाले तरी मनपाने व महावितरणने या कामांसाठी आपल्याकडे निधी नसल्याचे सांगत हात वर केले.
त्या दरम्यान महामार्गाच्या कामासाठी ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करणे व ३ चौकांमध्ये व्हेईकल अंडरपास (वाहनांसाठी भुयारी मार्ग) व १ पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग या कामासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार निविदा मिळाल्यानंतर गुडगाव येथील जेसीसी या कंपनीला हे काम देण्यात आले. कंपनीला काम तर दिले आहे मात्र महावितरण व मनपाकडून अद्यापही विद्युत खांब न हटविल्याने ते अडथळे ठरू पाहत आहे.
अशाच प्रकारे शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठीदेखील मनपाने जलवाहिनी व महावितरणने विद्युत खांब स्थलांतरीत करणे अपेक्षित होते. मात्र तेथेही तसे न झाल्याने हा प्रकार अडथळा ठरत आहे.
अखेर जिल्हा प्रशासनाने पाठविला प्रस्ताव
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणे हे शहरवासीयांसाठी महत्त्वाचे असल्याने त्याचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकाºयांनी यासाठी सहा कोटी रुपये देण्याचे मान्य करीत तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर हे काम ेहोणार आहे.
विशेष बाब म्हणून निधीची मागणी
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अडथळे ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरने जिल्हा विकास नियोजन समितीकडे (डीपीडीसी) जवळपास ५ कोटी रुपयांची मागणी केली. मात्र जिल्हा स्तरावरून एवढा निधी तत्काळ देता येणार नसल्याने तसा प्रस्ताव डीपीडीसीमार्फत शासनाकडे पाठविण्यात येऊन ऊर्जा सचिवांकडे विशेष बाब म्हणून या निधीला मंजुरी मिळण्याची मागणी केली आहे.
हे दोन्हीही प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून ते मंजूर झाल्यानंतरच हे कामे होतील, एवढे मात्र निश्चित आहे. त्यामुळे मनपा व महावितरणच्या अडमुठे धोरणामुळे हे काम रेंगाळत असल्याचे एकूणच चित्र आहे.

महामार्गावरील विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरणने निधीची मागणी केली आहे. मात्र जिल्हास्तरावर निधी देता येणार नसल्याने तो प्रस्ताव शासनाकडे पाठवून ऊर्जा सचिवांकडे विशेष बाब म्हणून मंजुरीची मागणी केली आहे.
प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी.

Web Title: Shivajinagar flyover and highway intersection Bhitjit Ghongde, Municipal Corporation and Mahavitaran hand over Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव