शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बोदवड येथे घरकुलप्रश्नी शिवसेनेचा नगरपंचायतीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 18:39 IST

भोगवटाधारकांना घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी लाभार्र्थींनी गुरुवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली बोदवड नगरपंचायतीवर मोर्चा काढला.

ठळक मुद्देमुख्याधिकारी हजर नसल्याने तासभर ठिय्यातहसीलदारांनी नगरपंचायत कार्यालय गाठत स्वीकारले निवेदन

बोदवड, जि.जळगाव : भोगवटाधारकांना घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी लाभार्र्थींनी गुरुवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली बोदवड नगरपंचायतीवर मोर्चा काढला.शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी, बजरंगपुरा, विवेकानंद नगर, प्रभाग क्रमांक १६, १७ व आठमधील सुमारे चारशेवर भोगवट्याच्या जागेवर राहणाऱ्या नागरिकांनी गत ४० वर्षांपासून या जागेवर अतिक्रमण केले होते. याबाबत भुसावळ येथील प्रांताधिकारी कार्यालयात शासनाच्या या जागेवर त्यांनी गट क्रमांक ५७९, ५८० वर राहणारे अतिक्रमणाचे सुमारे ३७८ अतिक्रमणधारकांनी, मागासवर्गीय नागरिकांनी सात रुपये बाजारभाव तर इतर नागरिकांनी यापेक्षा अडीच पट दंड भरून रीतसर जागा नोंदणी केली. परंतु या जागेवर अद्यापही भूमापन विभागात नोंद केली नाही. वर्षानुवर्षे नगरपंचायतीला नळपट्टी, घरपट्टी व दिवाबत्ती कर भरूनही या जागेवर असलेल्या झोपड्या पाडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ नगरपंचायतीकडून मिळत नाही. घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी लाभार्र्थींनी नगरपंचायतीला लेखी तक्रारी दिल्या होत्या. त्यावर नगर पंचायतीने ही जागा शासनाच्या भूमापन विभागात नोंद तसेच बिगर शेत जमीनमध्ये नोंद नसल्याचे कारण सांगून घरकुलाच्या प्रकरणातून वगळले.यामुळे गुरुवारी या परिसरातील सुमारे दोनशेवर झोपडपट्टीधारकांनी विवेकानंद नगरमधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर मोर्चा काढला. जिल्हा उपसंघटक अस्लम शेख, गजानन खोडके, शांताराम कोळी, गोपाळ पाटील, इस्राएल शेख, कलीम शेख, सुनील पाटील आदी शिवसेना पदाधिकारी तसेच या भागातील नागरिक उपस्थित होते.नगरपंचायत कार्यालयात निवेदन देण्यासाठी आले. परंतु मुख्याधिकारी हजर नसल्याने जनभावनांचा आक्रोश व्यक्त वाढला अन् नगरपंचायत कार्यालयात तासभर ठिय्या मांडला. त्यानंतर तहसीलदार रवींद्र जोगी यांनी नगरपंचायत कार्यालय गाठत निवेदन स्वीकारले. याबाबत नगरपंचायत व भूमापन विभागालाही पत्र देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :agitationआंदोलनBodwadबोदवड