शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरात शिवसेनेतर्फे परिचारिकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 15:27 IST

उपजिल्हा रुग्णालयातील  परिचारिकांचा जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने शिवसेनेच्या वतीने  सत्कार करण्यात आला. 

मुक्ताईनगर : कोरोना महामारीच्या संकट काळात रुग्णांची शुश्रूषा आणि कर्तव्य बजाविण्यासाठी कणखरपणे  सेवा देणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालयातील  परिचारिकांचा जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने शिवसेनेच्या वतीने  सत्कार करण्यात आला. 

तब्बल सव्वा वर्ष लोटले. कोरोना संसर्गजन्य आजाराने अवघे जीवनमान बदलवून टाकले. माणसं माणसापासून दुरावली. सुरक्षित अंतर हा जरी उपाय असला तरी बाधित रूग्णांना आपुलकी सेवा सुश्रुषक देऊन रुग्णालयातील परिचारिका सामाजिक बांधिलकी घेतलेल्या सेवाव्रत कार्याची पूर्ती करून  रुग्णांना आधार देत आहे. स्वतःचे जीव धोक्यात घालून त्यांची रुग्णसेवा आज अनेक रुग्णांसाठी जीवनदायी बनत आहे. कोविड रुग्णांच्या सेवा समर्पणासाठी या परिचारिका स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांपासून लांब आहेत. हॉस्पिटलमध्ये रुग्णांची, तर घरी कुटुंबाला संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षेची काळजी अशा स्वरूपात कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या अधिपरिचारिका व परिचारिका या कोरोना योद्ध्यांचा सत्कार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना परिवाराच्या वतीने गुलाबपुष्प भेट देऊन करण्यात आला.   यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख गणेश टोंगे, शहर संघटक वसंत भलभले, महिला आघाडी शहर संघटिका सरीता कोळी,  पप्पू मराठे, संतोष माळी आदींची उपस्थिती होती.

परिचारिका म्हणतात...

कोरोना संसर्गजन्य आजार आमच्या क्षेत्राची सत्वपरीक्षेचा काळ होय. सुरुवातीला मनात थोडी भीती वाटली. मानसिक दडपणही आले. परंतु आयुष्यात कठोर प्रसंगाला धैर्याने सामोरे जाणे हाच पर्याय असतो. रुग्ण संख्या वाढतच आहे. मात्र रुग्ण बरा होऊन डिस्चार्ज होताना आपण केलेल्या  कामाचे सार्थक झाल्यासारखे वाटते, अशी भावना सत्कारप्रसंगी सर्व परिचारिकांनी व्यक्त केली व सत्कार केल्याबद्दल  आभार व्यक्त केले.

 

टॅग्स :Socialसामाजिक