शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

पाचोरा येथे वीज कंपनीविरोधात शिवसेनेचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:21 IST

नवीन विद्युत मीटर बसविल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनवीन वीज मीटर बसविणे ठरतेय तापदायकजुने मीटर पूर्ववत बसविण्याची होतेय मागणी

पाचोरा, जि.जळगाव : नवीन विद्युत मीटर बसविल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.राज्य वीज कंपनीकडून शहरात वीज ग्राहकांची जादा वीज बिल आकारणी करून लुटमार होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. नवीन मीटर बसवून वीज ग्राहकांना भरमसाठ बिले पाठविली आहेत. तेव्हा तातडीने नवीन मीटर काढून जुने मीटर बसवावे व वीज बिले कमी करावी यासाठी पाचोरा येथे शिवसेनेतर्फे सोमवारपासून तहसील कार्यालयाजवळ बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.शहरात एका कंपनीचे नवीन मीटर सक्तीने वीज ग्राहकांकडे बसविले जात असून, जुने चांगले मीटर काढून नेले जात आहेत. नवीन मीटर बसविल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वीज बिल आकारणी केली जात आहे .नवीन मीटर जोरात फिरत असून जास्त युनिट आकारणी होत आहे. याप्रकरणी गेल्या आठवड्यात शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारवकर यांनी निवेदनाद्वारे वीज मंडळाला इशारा दिला होता. वीज कंपनीने नवीन मीटर बसवणे तूर्त थांबवले. मात्र शहरात बहुतेक ठिकाणी नवीन मीटर सक्तीने बसविल्याने लुटमार सुरूच आहे. ही लूटमार थांबवावी, जुने मीटर पुन्हा बसवावे, नवीन मीटर काढून घ्यावे यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारावकर हे शिवसैनिकांसह बेमुदत उपोषणास बसले आहेत. उपोषणस्थळी आमदार किशोर पाटील यांनी भेट देऊन तातडीने कारवाई करण्याच्या वीज वितरण कंपनीला सूचना केल्या. उपोषणास शहरातून पाठिंबा मिळत आहे. शिवसेनेच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख मंदाकिनी पाटील, बेबाबाई पाटील यांच्यासह महिला आघाडी शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनPachoraपाचोरा