शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

जळगावात टागोर नगर व व्यंकटेश कॉलनीत शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 12:55 IST

तीन कोरोना बाधितांचा मृत्यू

जळगाव : शहरातील नवनवीन भागात रोज कोरोनाची एन्ट्री होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे़ सोमवारी शहरातील कन्टेनमेंट झोन वगळता टागोर नगर व व्यंकटेश कॉलनी या दोन भागांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे़ सोमवारी शासकीय पातळीवर २२ रुग्णांची नोंद करण्यात आली असून यातील १७ रुग्णांचा रहिवासाची माहिती रात्री समोर आलेली होती़शहरातील रुग्णसंख्या काहीच दिवसात अगदीच झपाट्याने वाढून ४६४ वर पोहोचली आहे़ दरम्यान, काही परिसरात आता रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे़ एलआयसी कॉलनीत दोन दिवसांपूर्वी पहिला रुग्ण आढळून आला होता़ याच परिसरात सोमवारी ४ बाधित रुग्ण आढळले आहेत़ यासह मेहरूणमध्ये संसर्ग थांबत नसून रोज रुग्ण सापडत असल्याने या परिसरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे़ प्रतिबंधित क्षेत्रात अनेक दिवसानंतर रुग्ण आढळून येत असल्याने चाचण्या वाढवण्याची मागणी होत आहे़ सोमवार हा जिल्ह्यातील ७ तालुक्यांसाठी दिलासादायक ठरला़ भुसावळला प्रथमच एका दिवसात एकही रुग्ण आढळून आलेला नाही़ पाचोरा, यावल, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव या तालुक्यात सोमवारी एकही रुग्ण बाधित आढळलेला नाही़ तर २६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे़शिरसोलीत तीन, नशिराबादला एकशिरसोली/ नशिराबाद : जळगाव तालुक्यात दिवसागणीक कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. शिरसोली येथे तीन रुग्ण आढळून आले तर नशिराबाद येथील चौपाल मोहल्ला परिसरातील चाँदवाडा भागात सोमवारी एका तरूणाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन अग्निहोत्री यांनी दिली. आतापर्यंत कोरोना बाधीतांची संख्या १३वर पोहचली आहे तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.निगेटीव्ह अहवाल वाढलेगेल्या दोन दिवसात निगेटीव्ह अहवालांची संख्या वाढलेली असून काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे़ रविवारी ५५६ तर सोमवारी २०४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत़ दरम्यान, प्रलंबित अहवाल ३५८ असून सोमवारी ४९१ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़जिल्ह्यात एका दिवसात ८१ रुग्ण आढळलेजिल्ह्यात कोरोनाचे ८१ बाधित आढळून आलेले आहेत़ यात जळगाव शहर २०, शिरसोली ३, नशिराबाद १, अमळनेर २, चोपडा, भडगाव येथे प्रत्येकी १, धरणगाव ७, जामनरे १५, रावेर १०, बोदवड २० असे रुग्ण आढळून आले आहेत़२२ वर्षीय तरूणीसह ७ बाधितांचा मृत्यूजिल्ह्यात सोमवारी ७ बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ यात रावेर तालुक्यातील २२ वर्षीय महिला, जळगाव शहरातील ५२ वर्षीय महिला, ६५ वर्षीय तसेच ६० वर्षीय वृद्ध यासह धरणगाव, चोपडा, पाचोरा येथील बाधितांचा मृत्यू झाला आहे़ यात जळगाव शहरातील दोन मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर एक मृत्यू हा गणपती रुग्णालयात झाला आहे़ २२ वर्षीय महिलेला अ‍ॅनेमियाचा आजार होता़ ही महिला १६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली होती़ २१ रोजी दुपारी सव्वा दोन वाजता या महिलेचा मृत्यू झाला़

टॅग्स :Jalgaonजळगाव