शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

शरद पवार करणार लोकसभा, विधानसभेची चाचपणी; अमळनेरात ग्रंथालय सेलचे अधिवेशन

By सुनील पाटील | Updated: June 14, 2023 16:30 IST

या अधिवेशनाच्यानिमित्ताने पवार लोकसभा आणि विधानसभेची चाचपणी केली जाणार असल्याची माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अमळनेरात १६ जून रोजी राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. त्याचे उद‌्घाटन शरद पवार यांच्याहस्ते तर समारोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याहस्ते होणार आहे. या अधिवेशनाच्यानिमित्ताने पवार लोकसभा आणि विधानसभेची चाचपणी केली जाणार असल्याची माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यालयात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, ग्रंथालय सेलचे उमेश पाटील, माजी आमदार अरुण पाटील, योगेश देसले, विलास पाटील, अशोक लाडवंजारी, मंगला पाटील, ॲड.रोहिणी खडसे-खेवलकर, ॲड.सचिन पाटील आदी उपस्थित होते. शरद पवार गुरुवारी रात्री ९ वाजता राजधानी एक्सप्रेसने जळगावात येतील. रात्री जैन हिल्स येथे मुक्काम केल्यावर १६ रोजी सकाळी ८ वाजता अमळनेरकडे रवाना होतील. शिंदखेडा तालुक्यातील कार्यक्रमांना ते हजेरी लावतील. त्यांच्यासोबत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड असतील. सर्व नेते अमळनेरात मुक्काम करतील. या दरम्यान ते जळगाव व अमळनेरात काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरीही भेट देणार आहेत. अधिवेशनात ९ ग्रंथालयांना शरदचंद्रजी पवार ग्रंथमित्र पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

दोन खुल्या जीपमधून रोड शोअमळनेरात दोन खुल्या जीपमधून शरद पवार रोड शो करणार आहेत. त्यादृष्टीने तयारी झालेली आहे.पावसाचे वातावरण असले तर हा शो रद्द होऊ शकतो, असे आमदार पाटील यांनी सांगितले. अमळनेरातील ज्या जागेसाठी उपोषण करण्यात आले, त्या जागेची पाहणी अजित पवार करणार आहेत.

जि.प. न.प.चीही तयारीदोन्ही लोकसभा आणि प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आढावा घेऊन कोणत्या ठिकाणी कोण संभाव्य उमेदवार असू शकतो, आघाडीत कोणाची कुठे ताकद आहे याची चाचपणी करण्यासोबतच सरकारने या निवडणुकांच्या आधी जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत दाखवली तर त्याचीही तयारी असावी, त्यादृष्टीने नियोजन केले जाणार आहे. लोकसभेसोबतच विधानभेची निवडणूक झाली तर त्यासाठी देखील पक्षाची तयारी असायला हवी म्हणून त्याचाही आढावा घेतला जाणार आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव