शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

वाडे येथे गुरुवारपासून शनैश्वर महाराज यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:32 IST

३ रोजी कुस्त्यांची दंगल

भडगाव : भडगाव तालुक्यातील वाडे येथील श्री शनैश्वर महाराज मंडळामार्फत श्री शनैश्वर महाराज यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त १ ते ३ फेब्रुवारीयादरम्यान विविध कार्यक्रमांचे होणार आहे.गिरणा नदीच्या काठावर भाविकांनी श्री शनैश्वर महाराजांचे भव्य मंदिर बांधले असून दरवर्षी येथे यात्रा भरते. यंदाही १ फेब्रुवारीपासून ही यात्रा भरणार असून मंदिरावर आकर्षक रोशणाईसह सजावट करण्यात आली आहे. यात्रोत्सवानिमितत दर्शनासाठी परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होते. या सोबतच येथे पूजा, अर्चा नित्याने होत असते.विविध कार्यक्रमयात्रोत्सवानिमित्त १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान धार्मिक कार्यक्रमांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात १ रोजी सकाळी ११ वाजता मंदिराजवळ महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. यावर्षी महाप्रसाद, अन्नदानाचे दातृत्व येथील गोरख महाजन, एकनाथ महाजन, काशिनाथ महाजन, बापू महाजन यांच्या परिवाराच्यावतीने करण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता मंदिराजवळ चाळीसगावचे बाल कीर्तनकार हभप हरि महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. २ रोजी दुपारी ४ वाजता चौकातून श्री शनैश्वर महाराज मंदिरापर्र्यंत तगतरावाची मिरवणूक निघणार आहे. रात्री ९ वाजता माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे. ३ रोजी सकाळी ११ वाजेपासून मंदिरालगतच्या गिरणा नदीच्या पात्रात कुस्त्या होणार आहे.यात्रोत्सवासह विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. शनैश्वर महाराज मंडळातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव