शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भुसावळात रेल्वेची दुचाकी व चारचाकी पार्किंग भरउन्हात शेडविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:49 IST

रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंग शेडच नसल्याने भर उन्हात करावी लागत आहे. यामुळे, वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देवाहनांचे नेहमी होते नुकसानवाहनधारकांना नाईलाजास्तव वाहने करावी लागतात उभी

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंग शेडच नसल्याने भर उन्हात करावी लागत आहे. यामुळे, वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.रेल्वे प्रशासनाने रेल्वे कर्मचारी तसेच इतरांसाठी रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था केली आहे दक्षिणेकडील पार्किंगमध्ये एका रांगेत ८० दुचाकी, तर अशा १० ते १२ रांगा एकाच वेळेस लागतात. जवळपास एक हजारापेक्षा जास्त वाहने पार्क होतात. एका वाहनासाठी पाच तासांकरिता पाच रुपये, ५ ते १२ तासांकरिता १० रुपये व एका दिवसाकरीता १५ रुपये अशी दर आकारणी केली जाते. मासिक वाहन पार्किंगसाठी प्रति महिना २०० (रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी) व इतरांसाठी ४०० रुपये दुचाकी वाहनाची पार्किंग फी आकारली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांची वसुली होत असताना मात्र त्यामानाने सुविधा नाही.तीव्र उन्हात दुचाकी शेडविनाहॉट सीटी भुसावळचे तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त असते. अशा उन्हात वाहने उन्हातच लावावी लागतात. यामुळे वाहनातील पेट्रोल उन्हामुळे उडते. वाहनांचे रंग पुसट होतात तर चाकांमधील हवाही कमी होते. एकूणच पैसे देऊनसुद्धा भर उन्हामध्ये वाहने उभी करायला करावी लागतात. यामुळे मक्तेदार व व दुचाकी वाहन लावणारे यांच्यात नेहमी खटके उडत असतात.एक कोटीचा ठेका, सुविधा मात्र शून्यदक्षिणेकडील रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकी वाहनाचा ठेका जवळपास एक कोटीच्या घरात दिला गेला आहे. यात १८ टक्के जीएसटी अधिक दोन टक्के टीसीएसची रक्कम अतिरिक्त अदा करावी लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रशासनाला उत्पन्न मिळत असून, मात्र सुविधा नाही. फक्त वाहने वाहने रांगेत उभे राहतात तेवढेच. वास्तविक पाहता उन्हाळ्यात, पावसाळ्यात वाहनांना शेड आवश्यक आहे तसेच वाहन पार्किंग करत असताना एखादं कुटुंब जर सोबत असल्यास त्यांची बैठक व्यवस्था तसेच स्वच्छतेसाठी शौचालयाची, पाण्याची व्यवस्था असणेही गरजेचे आहे. परंतु नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे.चार चाकी वाहनाचीही उघड्यावरच पार्किंगलोहमार्ग पोलिसांच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या चार चाकी वाहनांची पार्किंग ही शेडविना उघड्यावरच केली जाते.कार पार्किंगसाठी पाच तासासाठी १५ रुपये व एका दिवसासाठी ३५ रुपये आकारणी केली जाते. मात्र सुविधा त्याप्रमाणे मिळत नाही.उत्तरेकडील पार्किंगही उघड्यावररेल्वेस्थानकाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारासमोरील दुचाकी वाहनांची पार्किंग ही उघड्यावरच केली जाते. येथेही शेड नसल्यामुळे उन्हातच दुचाकी वाहने लावावी लागतात. येथे तर खाली फ्लोरिंगसुद्धा केलेली नाही. तसेच फूट ओव्हर ब्रिजवरून प्रवासी अनेक वेळा पार्किंगमध्ये थुंकतात. त्यामुळे वाहनावर अनेक वेळा घाण होत असते.या पार्किंगमध्ये ८० वाहनांच्या जवळपास सहा ते आठ रांगा दररोज लागतात. कडक तापमानामुळे नुकताच रेल्वे मालगाडीचा डबा, चार चाकी वाहने पेटण्याच्या घटना घडल्या होत्या. अशातच पार्किंगमध्ये शेड नसल्यामुळे एखाद्या दुचाकी वाहनाने पेट घेतला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दुचाकी पार्किंगमध्ये भरउन्हात दुचाकी पार करावे लागते. पार्किंगमधून काढल्यानंतर १५ मिनिटांपर्यंत सावलीत गाडी उभी करावी लागते. त्यानंतर पुढील प्रवास होतो. फार त्रासदायक स्थिती आहे.-विजया मोरे, लेक्चरर, तंत्रनिकेतन कॉलेज.शेड नसल्यामुळे उन्हातच वाहने उभी करावी लागतात. यामुळे गाडीतील पेट्रोल उडते. गाडीचा रंग पुसट होतो. पर्याय नसल्याने नाईलाजाने उन्हातच दुचाकी लावावी लागते.-गणेश काकडे, शिक्षकशेड नसल्याने दुचाकी इतकी गरम होते की कपड्याच्या सहाय्याने गाडी पार्किंगमधून काढावी लागते. गाडी १५-२० मिनिटे सावलीत उभी करून नंतरच गाडीवर बसणे शक्य होते. शेड असणे अत्यंत आवश्यक आहे.-शेख अखलाक शेक सरदारपाण्याच्या व्यवस्थेचा व बसण्यासाठी पार्किंगमध्ये तरतूद नाही. शेडविषयी सूचना करण्यात येतील. लवकरच शेड उभारण्यात येईल.-आर.के.शर्मा, वरिष्ठ वाणिज्य मंडल व्यवस्थापक, भुसावळ विभाग

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ