शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

शानभाग विद्यालयाने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:04 IST

लघु बालनाट्य स्पर्धा : नाट्यातून दिला सामजिक संदेश : रॅलीमध्ये ७०० विद्यार्थ्यांचा समावेश

जळगाव- बालनिरिक्षण गृहातील जीवन, बालविवाह, बाजमजुरी तसेच चांगला व वाईट स्पर्श यासह विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी लघु बालनाटीकांमधून प्रकाश टाकत सामाजिक संदेश दिला़ बुधवारी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात पार पडलेल्या या लघु बालनाट्य स्पर्धेत निकालअंती शानभाग विद्यालयाने बाजी मारत बक्षीस पटकाविले़बालहक्क दिनानिमित्त बुधवारी केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्प व जिल्हा महिला व बालविकास समितीच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८़१५ वाजेच्या सुमारास सागर पार्क येथून विद्यार्थ्यांच्या रॅलीला सुरूवात झाली़ सुमारे २२ शाळांमधील ७०० बालकांचा रॅलीमध्ये समावेश होता़ त्यांच्या हातात बालव्यथा, समस्या व त्यावरील उपाय सूचक फलक होते़ या रॅलीला डॉ़ राजेश डाबी, विजयसिंग परदेशी, दिलीप चोपडा, डॉ़ शैलजा चव्हाण, अनिता कांकरिया यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ झाली़ त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या़ त्यानंतर रॅलीचा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे समारोप झाला़वाढीव अपेक्षेच दडपणदरम्यान, सकाळी १० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित लघु बालनाटीका स्पर्धेच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सवक डॉ़एऩएस़चव्हाण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, वैजयंती तळेले, प्रदीप पाटील, डॉ़ शैलजा चव्हाण, दिलीप चोपडा आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती़ चोपडा यांनी प्रास्ताविका सर्वेक्षणाची माहिती दिली़ त्यात त्यांनी ६० टक्के बालकांवर पालकांच्या वाढीव अपेक्षेचे दडपण व पालकांसोबतचे हरवलेले संवाद आढळून आले़ तसेच डॉ. एन.एस. चव्हाण यांनी मनोगतात बेटी बचाओ अभियानात केलेल्या कार्याची माहिती देत मार्गदर्शन केले़सामाजिक प्रश्नांवर टाकला प्रकाशबालनाट्य स्पर्धेच्या सुरूवातीला अ‍ॅड. महिमा मिश्रा यांच्या ६ सहकाऱ्यांनी तारे जमीपर या गीतावर नृत्य सादर केले़ उत्कृष्ट सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांकडून टाळ्यांचा गजर झाला़ त्यानंतर लघुनाटीकेला सुरूवात झाली़ ९ शाळांमधील विद्यार्थ्यांनी लघू नाटीका सादर केली़ त्यामध्ये बाल विवाह, बालमजुरी, लेगिक शोषण, वाईट व बरा स्पर्श आदी विषयांचा समावेश होता़ त्यानंतर परीक्षक अमोल ठाकूर व दीपक भट यांनी निकाल जाहीर केला़ प्रथम क्रमांक शानभाग विद्यालयातने तर द्वितीय क्रमांक विवेकानंद प्रतिष्ठान इग्लिश स्कूल,वाघनगर यांनी तर तृतीय क्रमांक दांडेकर नगरातील स्वामी समर्थ माध्य.विद्यालयाने पटकाविला़ तसेच उतेजनार्थ दादावाडी येथील बालविश्व इग्लिश मिडीयम स्कूल यांना पटकाविला़ स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देवून सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी भट यांनी तर आभार डॉ़ शैलजा चव्हाण यांनी मानले़ मंजुषा पवनीकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी समतोल व्यास्थापिका सपना श्रीवास्तव व कार्यकर्ते सोबत चाईल्ड हेल्पलाईनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव