शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ५८० अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार; पगारही वसूल करणार?
2
मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार 'सुपर कूल'; मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार
3
राज्यपालांनी विधेयक अडवून धरल्यास राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे यावे
4
ठाण्यातील उद्योजकांना खंडणीसाठी धमक्या ! पुण्यानंतर ठाण्यातही ‘माथाडीं’च्या नावाखाली छळवणूक
5
Mehul Choksi: स्वित्झर्लंडला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच ठोकल्या बेड्या
6
मुंबई-गोवा हायवे जूनपर्यंत पूर्ण होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
7
Heat Wave in Maharashtra: महाराष्ट्रातील ‘हिल’ स्टेशन्सची वाटचाल ‘हीट’ स्टेशन्सकडे
8
Mumbai: खासगी टँकर, विहिरी आणि कूपनलिकांना मुंबई महापालिकेचा दिलासा
9
Mumbai Temperature: महामुंबई दिवसेंदिवस होतेय ‘ताप’दायक; पारा पोचला ४० अंशांपार
10
"आता टोलबद्दल तुमची तक्रार राहणार नाही, १५ दिवसांत नवीन पॉलिसी..."; नितीन गडकरींचे मोठं विधान
11
बिहार विजयाचे BJPचे स्वप्न धुसर होणार? बड्या मित्रपक्षाचा NDAला रामराम; INDIA आघाडीत जाणार!
12
“उद्धव ठाकरे यांना राऊतांपासून खरा धोका, तेच पक्ष चालवतात”; शिंदेंच्या नेत्याने सगळेच काढले
13
'मॅन ऑफ द मॅच' ठरल्यावर धोनीही सरप्राइज! नवा इतिहास रचला अन् कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी
14
"माझी आई मला म्हणाली होती, नितीन एवढा रस्ता चांगला कर; म्हणून मी आज...!" गडकरींनी सांगितली आईनं व्यक्त केलेली इच्छा
15
IPL 2025 LSG vs CSK : पंत चुकला! धोनी-शिवम दुबे जोडी जमली; ५ पराभवानंतर CSK नं अखेर मॅच जिंकली!
16
दोन दिव्यांग मुलांचे पालक तिसरे मूल दत्तक घेऊ शकतात -मुंबई उच्च न्यायालय
17
ग्लोव्ह्ज न काढता MS धोनीचा नॉन स्ट्राइक एन्डला डायरेक्ट थ्रो; माजी क्रिकेटर म्हणाले, हा 'तुक्का'च
18
बॉम्बने उडवून टाकेन! सलमानला धमकावणाऱ्याला मुंबई पोलिसांनी शोधून काढलं; समोर आली मोठी माहिती
19
"कायद्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही, धर्म..."; हिंसाचारानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलं शांततेचं आवाहन 
20
“दिलेली वचने सरकार पूर्ण करत नाही, देश हळूहळू हिटलरशाहीकडे...”; प्रणिती शिंदेंची टीका

सेक्स स्कॅँडल ते आजचे मदिरा ललना प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 23:42 IST

विविध घटनांमुळे नेहमी चर्चेत रहाणारे जळगाव शहर १९९४ च्या दरम्यान चर्चेत आले होते ते कथित सेक्स स्कॅँडल प्रकरणामुळे. त्यावेळीही काही राजकीय मंडळी या प्रकरणामध्ये जेलची वारी करून आले. आता पुन्हा राज्यभर चर्चा सुरू आहे, ती काही राजकीय मंडळींच्या ‘ललना’ प्रेमाची...

ठळक मुद्देललना प्रकरणाची होतेय मोठी चर्चानिमित्त होते ३१ डिसेंबरच्या सोहळ्याचे‘त्या फार्महाऊस’वर नेमके कोणकोण होते?

चंद्रशेखर जोशीजळगाव : विविध घटनांमुळे नेहमी चर्चेत रहाणारे जळगाव शहर १९९४ च्या दरम्यान चर्चेत आले होते ते कथित सेक्स स्कॅँडल प्रकरणामुळे. त्यावेळीही काही राजकीय मंडळी या प्रकरणामध्ये जेलची वारी करून आले. आता पुन्हा राज्यभर चर्चा सुरू आहे, ती काही राजकीय मंडळींच्या ‘ललना’ प्रेमाची... निमित्त होते ‘३१ डिसेंबरच्या स्वागत सोहळ्याचे’ सरत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाचे स्वागत करण्याची ही नवी पद्धती (शहरासाठी हं) भल्याभल्यांना चर्चेत आणणारी ठरली आहे. यातून मग चर्चा रंगताय, त्या म्हणजे त्या फार्महाऊसवर नेमके कोणकोण होते. कोणी सांगतंय हे भाऊ... कोणी म्हणतात... ते काका तर कोणी म्हणतात.. आमचे मामा... तर कोणी अधिकाऱ्यांचीही नावे सांगत आहेत. नगरपालिका ते महापालिका या प्रवासात वर्षानुवर्षे पालिका क्षेत्रातील राजकीय प्रवासातील काही जण तर त्यावेळी होते व आताही आहेतच. सेक्स स्कॅँडल गाजले त्यावेळीही अशाच चर्चा सुरू होत्या, मात्र त्यावेळी फसलेल्या छोट्या-मोठ्या लोकप्रतिनिंचे भाग्य असे की तो काळ मोबाईलचा नव्हता. सोशल मीडियाचा प्रभाव किंवा अस्तित्व नव्हते. मात्र तरीही तेव्हाचा विषय राज्यभरच नव्हे तर अन्य राज्यांपर्यंत पोहोचला. सरकारनेही दखल घेऊन विषयाच्या खोलात जाऊन चौकशीसाठी तेव्हाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अरविंद इनामदार, मीरा बोरवणकर व स्व.दीपक जोग यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाºयांची नियुक्ती केली होती. या अधिकाºयांनी खोलात जाऊन अनेकांचे पितळ त्यावेळी उघडे पाडले. काही जण तर दोन-तीन वर्षे कारागृहातच होते. त्यावेळी सोशल मीडिया नसल्याने जळगावातील कोणी बाहेरगावी गेले की त्यांना त्या गावातील मंडळी अगत्याने बोलावून तुमच्या गावात नेमके काय घडले... कसे घडले याची माहिती अगदी अगत्याने विचारत असल्याचे अनुभव आजही जुनी मंडळी सांगते. त्यानंतरही काही प्रकरणे घडली. एका बड्या राजकीय नेत्याचे नाव घेऊन फर्दापूर येथे घडलेले ‘मदिरा आणि मीनाक्षी’ हे प्रकरणही खूप गाजले. मात्र खºया अर्थाने चर्चेत आले ते ममुराबाद रोडवरील कोल्हे यांच्या फार्महाऊसवरील ३१ डिसेंबरच्या रंगीत, संगीत व ललनांसह झालेल्या पार्टीची. या प्रकाराचे नेमके कंगोरे कसे आहेत. हे राजकीय मंडळी चांगले जाणतात. अगदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप राजकीय मंडळी करत आहेत. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेतली जाणार आहे की नाही, असा प्रश्न जनमानसातून केला जात आहे, तर कॉँग्रेस, राष्टÑवादीने या प्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे यातही दारू का पाणी...नव्हे दूध का दूध ... होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव