शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

जळगावातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी आवश्यक कामे तत्काळ मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 12:10 IST

सह संचालकांकडून ‘सिव्हिल’च्या पाहणीदरम्यान सूचना

ठळक मुद्देएमसीआय पथक भेटीच्या पार्श्वभूमीवर आढावाद्वितीय वर्षाच्या पाचही विभागांची पाहणी

जळगाव : नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे(एमसीआय) पथक भेट देणार असून त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सह संचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात (वैद्यकीय महाविद्याय) भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी राहिलेले व आवश्यक कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.जळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात जिल्हा रुग्णालयापासून झाली आहे. त्यात आॅगस्ट २०१८पासून वैद्यकीय शिक्षणाच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास सुरुवात झाली आहे. प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने तत्काळ द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव मागविला व त्यानुसार येथे द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी तयारीदेखील सुरू झाली. त्यासाठी जिल्हा रुग्णालय आवश्यक ते बदल व सुधारणा करण्यास सुरुवात झाली आहे.प्रथम वर्षासाठी ज्या प्रमाणे भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एमसीआय) पथकाने येथे भेट देऊन पूर्ततेची पाहणी करूनच मान्यता दिली त्यानुसार द्वितीय वर्षाच्या तयारीचाही आढावा घेण्यासाठी हे पथक येणार आहे. हे पथक अचानक भेट (सरप्राईज व्हिजिट) देणार असल्याने ते कधी येईल त्या बाबत गुप्तता पाळली जाते.द्वितीय वर्षाच्या पाचही विभागांची पाहणीएमसीआय पथक भेटीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील तयारीचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सह संचालक डॉ. प्रकाश वाकोडे (मुंबई) यांनी शुक्रवारी जिल्हा रुग्णालयास भेट दिली. या वेळी त्यांनी द्वितीय वर्षासाठीच्या मायक्रोबायोलॉजी विभाग, पॅथॉलॉजी, फॉरेन्सीक मेडिसीन, फॉर्मेकालॉजी, पीएसएम या पाच विभागांची पाहणी करून तेथील तयारीचा आढावा घेतला. यामध्ये जी कामे अपूर्ण आहेत त्या बाबत सूचना देऊन ती तत्काळ पूर्ण करा व या विभागांसह इतर ठिकाणी आवश्यक असलेले कामे तत्काळ मार्गी लावा, अशा सूचना डॉ. वाकोडे यांनी दिल्या.उपकरणे मांडणीबाबत मार्गदर्शननिवासस्थाने पाडल्यानंतर त्या जागेसह परिचारिका प्रशिक्षण केंद्रानजीक द्वितीय वर्षासाठी तयारीला वेग आला आहे. त्यानुसार सर्व विभागांचे फलक लावण्यासह दुरुस्तीचे कामे केले जात आहे. यामध्ये प्रत्येक विभागात उपकरणांची मांडणी कशी असावी या बाबतही डॉ. वाकोडे यांनी सूचना दिल्या. त्यानंतर दुपारी अधिकाºयांची व विभागप्रमुखांची बैठक घेतली.या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील आदी उपस्थित होते. त्यांनी डॉ.वाकोडेयांनीविविधविभागांचीमाहितीदिली.घरचे काम म्हणून केल्यास कामे होतीलरुग्णालय परिसराची पाहणी केल्यानंतर डॉ. वाकोडे यांनी अधिकारी, प्राध्यापकांची बैठक घेतली. या वेळी त्यांनी प्रत्येकाकडून काय अडचणी आहे हे जाणून घेतले. आपण घरी ज्या प्रमाणे आपले काम करतो त्या प्रमाणे प्रत्येकाने मन लावून काम केल्यावरच कामे पूर्ण होतील, अशा सूचना दिल्या. स्थानिक पातळीवरील अडचणी येथेच दूर करा व वरिष्ठ पातळीवर येणाºया अडचणींसाठी मी पाठपुरावा करणार असून द्वितीय वर्षासाठी एमसीआयची मान्यता मिळवू, असा विश्वासही डॉ. वाकोडे यांनी व्यक्त केला. या बैठकीत त्यांनी आवश्यक मनुष्यबळ, जागा, यंत्रसामग्रीचाही आढावा घेतला.वसतीगृहाची केली पाहणीसंध्याकाळी डॉ. वाकोडे यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची पाहणी केली. तेथेही आवश्यक सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एमसीआयकडून अडचणी येणार नाही, असे सांगितले.स्थानिकांचे सहकार्य आवश्यकसध्या रुग्णालयात येणाºया रुग्णांची संख्या जास्त असल्याने येथे चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र जेवढ्या खाटा असतात त्यापेक्षा जास्त वाढविणे लगेच शक्य होत नाही. त्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जळगावात होणाºया वैद्यकीय महाविद्यालसायासाठी स्थानिक नागरिकांनीही सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सहकार्य करण्याची अपेक्षा डॉ. वाकोडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव