शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नोकराने पळविली मालकाची मुलगी, पालकांसोबत जाण्यास मुलीचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 23:15 IST

प्रेम हे आंधळ असतं याचा प्रत्यय जळगाव तालुक्यातील एका गावात आला. ज्या शेतमालकाकडे रोंजदारीने काम करायचा, त्याच मालकाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेत विवाह करुन हे प्रेमीयुगुल गुरुवारी थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाले. या प्रेम कहाणीतील प्रियकर हा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे.

जळगाव : प्रेम हे आंधळ असतं याचा प्रत्यय जळगाव तालुक्यातील एका गावात आला. ज्या शेतमालकाकडे रोंजदारीने काम करायचा, त्याच मालकाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेत विवाह करुन हे प्रेमीयुगुल गुरुवारी थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाले. या प्रेम कहाणीतील प्रियकर हा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावातील सधन शेतकºयाकडे त्या गावाच्या शेजारीच असलेल्या गावाचा २८ वर्षाचा तरुण कामाला होता. शेतात केळीचे घड व पाने कापण्याचे तो काम करीत होता. त्यामुळे मालकाच्या घरापर्यंत त्याचे येणे-जाणे होते. त्या ओळखीतून मालकाच्या २० वर्षीय मुलीशीच त्याचे प्रेमप्रकरण निर्माण झाले. या दोघांचे प्रेम इतके बहरले की, त्यांनी थेट पळून जाण्याचा निर्णय घेतला. ६ मार्च रोजी ते जळगाव बसस्थानकावरून थेट सुरत येथे पळून गेले. या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर मुलीच्या पालकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हरविल्याची तक्रार दिली. मुलीच्या आईला मानसिक धक्कादरम्यान, पळून गेलेले हे प्रेमीयुगुल लग्न करुन गुरुवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाले. हरविल्याची नोंद असल्याने पोलिसांनी पालकाला बोलावून घेतले. इकडे मुलगी पळून गेल्यामुळे आईला मोठा धक्का बसला.तिला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. वडील, भाऊ व अन्य नातेवाईक पोलीस स्टेशनला आले. तिची समजूत घातली, मात्र मुलीने पालकांसोबत येण्यास स्पष्ट शब्दात नकार देत पोलिसांनाही तसे लेखी लिहून दिले. याशिवाय पालकांपासून धोका असल्याचेही तिने लिहून दिले. त्यामुळे पालक अक्षरश: मुलीपुढे हातपाय जोडत होते, मात्र तरीही मुलगी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मनपरिवर्तनासाठी लहान भावाची तिची भेट घालून दिली.पण मुलगी आपल्या भूमिकेवर ठाम राहिली.तरुणाचे दुसरे लग्नज्या मुलासोबत ही मुलगी पळून गेली, त्या मुलाचे हे दुसरे लग्न आहे. आधीच्या पत्नीने त्याच्यापासून घटस्फोट घेतला आहे. दरम्यान, पळून जाण्याच्या आधी या मुलीचे लग्न निश्चित झाले होते. साखरपुड्याचाही कार्यक्रम झालेला आहे. ११ मार्च रोजी लग्नाची तारीख होती. हा मुलगा पुणे येथे खासगी कंपनीत ५५ हजार रुपये महिना पगारावर नोकरीला आहे. तरीही या मुलाला नाकारुन ही मुलगी शेतमजुरासोबत पळून गेली.