शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

जामठीत पाणी टंचाईने घेतले गंभीर स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 18:48 IST

बोदवड तालुक्यातील जामठी येथे पाणी टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक स्त्रोत आणि पाणी योजनांनीही टाकल्या माना.महिन्यातून एक किंवा दोन वेळाच पाणीपुरवठा

जामठी ता.बोदवड : येथे असलेले पाण्याचे स्त्रोत तसेच जेथून पाणी पुरवठा होतो अशा योजनांनीही टाकलेली मान यामुळे भर हिवाळ्यात पाणीटंचाईने गंभीर स्वरुप धारण केले असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.जामठी हे गाव जवळपास तीन हजार लोकवस्तीचे असून गावातील तीन प्रभागांना पाण्याच्या वेगवेगळ्या तीन स्त्रोतांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. गावातील प्रभाग क्रमांक एक मधील काही गल्ल्यांना पॉवर हाऊसिंग योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक एक हा सरपंचांचा प्रभाग असल्याने या प्रभागास दोन ते तीन दिवसांमधून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येतो म्हणून या प्रभागातील नागरिकांना पाणी टंचाई भासत नाही असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. प्रभाग क्र तीन मधील नागरिकांना बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा कमी अधिक स्वरूपात होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या बोअरवेलची मोटार दुरूस्तीअभावी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे प्रभाग क्र एक व तीन मधील काही गल्ल्यांना व संपूर्ण प्रभाग क्र. दोन मधील नागरिकांना ओडिए योजनेद्वारे मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागते. गेल्या काही दिवसांपासून ओडिएचा वीजपुरवठा खंडित झाल्याने तालुक्यासह जामठी गावास महिना उलटून ही पाणीपुरवठा न झाल्याने गावावर तिव्र पाणी टंचाईचे संकट कोसळले आहे. प्रत्येक घरात पाण्याचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर काही नागरिक टॅन्करव्दारे पाणी विकत घेतांना दिसत आहे. पाणीटंचाईची तिव्रता कमी व्हावी या करिता ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्यावर्षी तीन व या वर्षी तीन कुपनलिकांची निर्मिती केली. मात्र काही ठिकाणी चुकीचे ठिकाण (स्पॉट ) निवडल्याने या कुपनलिकांना पुरेसे पाणी लागू शकले नाही. त्यामुळे काही कुपनलिका पाण्या अभावी बंद अवस्थेत आहे. परिणामी या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे.विशेषत: (प्लॉट परिसर) दरम्यान पर्यायी व्यवस्था असतांनाही नियोजनाच्या अभावामुळे गावास टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे, असे ग्रा.पं.च्या विरोधी सदस्यांकडून सांगण्यात आले....मग पाणीपट्टी कशी भरणार?जामठी गावास वीस ते पंचवीस दिवस उलटूनही पाणीपुरवठा होत नसल्याने तसेच महिन्यातून दोन वेळा व वर्षातून फक्त चोवीस किंवा वीसच वेळा पाणीपुरवठा होतो. महिना - महिना उलटून ही पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीपट्टी कशी भरावी असा संतप्त सवाल नागरिकाकडून ग्रामपंचायतीच्या वसुली कर्मचाºयांना विचारला जात आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई