तालुक्यातील नेहता गाव व मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल गाव तापी नदीपात्राच्या ऐलतीर व पैलतीरावर असून दोन्ही बाजूला दोन्ही तालुक्यातील राज्य महामार्ग व त्यांना दोन्ही बाजूला तीन-तीन प्रमुख जिल्हा मार्ग असल्याने तथा सगेसोयरे असले तरी हतनूर धरणाच्या बॅक वॉटरमुळे मात्र लांब फेऱ्याने संपर्क साधावा लागतो. त्या अनुषंगाने नेहता व नरवेल गावांदरम्यान रावेर व मुक्ताईनगर तालुक्यांना जोडणारा तापी नदीपात्रात फुल-कम-बलून बंधारा बांधण्याच्या मागणीसाठी सोपान पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तगादा लावला होता. त्या अनुषंगाने अजित पवार यांनी तातडीने उचित कार्यवाहीचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना शिफारशीद्वारे दिल्याने जलसंपदा मंत्री पाटील यांनी तापी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांना तापी नदीपात्रात फुल-कम-बलून बंधारा बांधण्याबाबत सर्वेक्षण करून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पारित केले आहेत.
नेहता व नरवेल दरम्यान तापी नदीत पूल- कम-बलून बंधारा बांधण्यासाठी प्रस्ताव पाठवा-जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST