शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

सैनिकांसाठी पाठविल्या राख्या व शुभेच्छा पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 17:00 IST

निमगव्हाण जि.प.शाळा व युवकांचा अभिनव उपक्रम

चोपडा, जि.जळगाव : ‘एक धागा शौर्याचा, एक राखी अभिमानाची’ या तत्त्वाला अनुसरून निमगव्हाण, ता.चोपडा येथे जिल्हा परिषद केंद्रशाळेतील विद्यार्थिनी व गावातील सेवाभावी युवकांनी सीमेवर तैनात सैनिकांसाठी राख्या व शुभेच्छा पत्र पाठविले आहेत. या उपक्रमाद्वारे सीमेवरील सैनिकांना सुमारे १०० शुभेच्छा पत्रे व राख्या पाठविल्या.भारतीय सैनिक सलग बाराही महिने संरक्षणासाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून काम करत असतात. त्यामुळे त्यांना रक्षाबंधन या महत्त्वाच्या सणालाही आपल्या बहिणीच्या हाताने राखी बांधायला येणे शक्य होत नाही. अशा सैनिकी भावांचा या सणाच्या दिवशी उत्साह वाढावा, त्यांच्या हातून अखंडपणे चांगली देशसेवा घडावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून निमगव्हाण जि.प.शाळा व गावातील सेवाभावी युवकांच्या पुढाकाराने व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिल बाविस्कर, ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तथा संकल्पनेतून शाळेच्या प्रांगणावर हा अभिनव उपक्रम पार पडला.उपक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिक शिक्षक राजेंद्र पारधी, ज्ञानेश्वर बाविस्कर, उज्वला जोशी आदी शिक्षक वृंदासह युवा ग्रामपंचायत सदस्य अनिल बाविस्कर, अनिल पाटील, नरेंद्र मैराळे, लीलाधर बाविस्कर, उमेश बाविस्कर, किशोर बाविस्कर यांनी सहकार्य केले.उपक्रमासाठी निमगव्हाणचे रहिवासी सी.आर.पी.एफ चे जवान रूपचंद बाविस्कर , पुणे पोलीस शेखर बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभल्याचे मुख्याध्यापक अब्दुल पटेल यांनी सांगितले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकChopdaचोपडा