शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या तीन रासेयो स्वयंसेवकांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 19:26 IST

जळगाव : २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचालनसाठीच्या होणाऱ्या शिबीरासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर ...

जळगाव : २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचालनसाठीच्या होणाऱ्या शिबीरासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीन स्वयंसेवकांची निवड झाली आहे.एकाचवेळी तीन विद्यार्थ्यांची निवड होण्याची संधी विद्यापीठाला बऱ्याच वर्षानंतर प्राप्त झाली आहे. दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात सहभागी व्हावे ही रा.से.यो.च्या स्वयंसेवकांची इच्छा असते. हैद्राबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या पूर्व संचलन निवड व चाचणी शिबीरासाठी विद्यापीठातर्फे चार स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्यातील तीघांची दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबीरासाठी निवड झाली आहे. यामध्ये जी.टी.पाटील महाविद्यालय नंदूरबारच्या प्रतीक कदम, नवापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची प्रिती पाडवी आणि चोपडा येथील महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहित रायसिंग या तिघांचा समावेश आहे. नवी दिल्ली येथे १ जानेवारी पासून होणाऱ्या संचलन शिबीरात हे तिघे सहभागी होवून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील. निवड झालेल्या या स्वंयसेवकांचे कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील, प्र-कुलगुरू प्रा. पी.पी. माहुलीकर, व्य.प. सदस्य दिलीप पाटील, रा.से.यो. चे राज्य कार्यअधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे, विभागीय संचालक डी. कार्तीकेयन, प्रभारी कुलसचिव प्रा. बी.व्ही. पवार यांनी अभिनंदन केले आहे. रा.से.यो. संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी परीश्रमपुर्वक स्वयंसेवकांची निवड करून त्यांच्याकडून तयारी करून घेतली. त्याबद्दल डॉ. नन्नवरे यांचेही अभिनंदन करण्यात आले. रा.से.यो. जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. विजय मांटे, धुळे जिल्हा समन्वयक डॉ. वाल्मिक आढावे, नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम यांनीही या तिघांचे अभिनंदन केले.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव