यावेळी १३ पालक सदस्यांची निवड करण्यात आली. यात सहा पुरुष व सात महिलांची निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून मेहमूद खान अफजल खान पठाण तर उपाध्यक्ष म्हणून मनीषा चत्तर सिंग सपकाळ यांची सर्वानुमते निवड झाली. सदस्य म्हणून गोपाल ज्ञानदेव सपकाळ, वंदना राजू कोळी, रूपाली वासुदेव घुगे, उज्ज्वला प्रमोद कोळी, सविता राजू राऊत, सुपडू भीमराव सुरवाडे, आम्रपाली सुपडू सुरवाडे, विकास ओंकार राऊत, सुवर्णा प्रताप घोरपडे, कौतिक विश्वनाथ कोळी, गोपाल दशरथ गोरे यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष व सद्स्य यांचे अभिनंदन तळेगाव सरपंच आरती सुभाष कोळी, प्रशांत वाघ, अभियंता संतोष कोळी, गजानन कोळी, विनोद पाडोळसे व उपस्थित पालकांनी केले.