लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अंजनी आणि वाघूर धरण येथील सुरक्षा रक्षकांची नावासह शिफारस करण्यात यावी, तसेच अंजनी धरणावरील सुरक्षा रक्षकांचे जानेवारी ते जुलै २०२१ या सात महिन्यांचे वेतन द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी गार्ड ॲण्ड जनरल वर्कर्स युनियनने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले की, अंजनी व वाघूर धरण येथील सुरक्षा रक्षक यांची नावासह शिफारस द्यावी, तसेच अंजनी धरणावरील सुरक्षा रक्षक आणि पाटबंधारे विभाग, धुळे, जळगाव व नंदुरबार येथील सुरक्षा रक्षकांचे वेतन वेळेवर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी युनियनचे अध्यक्ष सोमा कढरे, गौरम पारवे, फकिरा चव्हाण, पूनमचंद निकम, सूरसिंग पाटील, हरी पाटील, शुभम पाटील, अजय पाटील, दत्तू पाटील, शरद पाटील उपस्थित होते.