शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक शिक्षक काळ्या फिती लावून करणार कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 20:13 IST

जळगाव : ठोक मासिक शिपाई भत्ता देण्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्ह्यातील ६०० शाळांमधील माध्यमिक शिक्षक काळ्या फिती लावून कामकाज आंदोलन करणार ...

जळगाव : ठोक मासिक शिपाई भत्ता देण्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्ह्यातील ६०० शाळांमधील माध्यमिक शिक्षक काळ्या फिती लावून कामकाज आंदोलन करणार आहे.विद्यमान कार्यरत पदावरील शिपाई संवर्गातील शिक्षकेतर पदे व्यपगत करण्यात येणार असून, सध्याच्या रिक्त पदांसाठी नियमित वेतन व भत्ते न देता प्रत्येक पदासाठी दरमहा ठोक स्वरूपात मासिक शिपाई भत्ता संस्थेला वेतन अनुदान स्वरूपात देण्याचा निर्णय एप्रिलपासून लागू करण्यात आला आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा व १२ फेब्रुवारी व २०१५च्या आदेशाने शासन नियुक्त भापकर समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आली आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार (दि.१८) रोजी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देतील. शुक्रवारी काळ्या फिती लावून कामकाज करावे, असे आवाहन एच. जी. इंगळे, आर. आर. पाटील, साधना लोखंडे, एस. डी. भिरुड, एस. एन. पाटील, सी. सी. वाणी, आर. एच. बाविस्कर आदींनी केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव